एक्स्प्लोर

Avinash Bhosale Case : उद्योजक अविनाश भोसले यांना दहा दिवसांची सीबीआय कोठडी

Avinash Bhosale Case : नजरकैदेत असलेल्या उद्योजक अविनाश भोसले यांना 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई  : येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. तसेच सीबीआयला अविनाश भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास मनाई कोर्टाने केली आहे. 

सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून  अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला होता. कोर्टाने हा दावा फेटाळला आहे.

अविनाश भोसले यांना अटक प्रकरण काय?

  • येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून याआधी चौकशी
  •  2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले
  •  वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
  •  सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता
  • बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश
  •  ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

ED : कोविडचे कारण सांगत हजर राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीने बजावले नवीन समन्स

ED : अविनाश भोसलेंच्या 4 कोटी किंमतीच्या जमिनीवर ईडीची टाच, मनी लॉन्डरिंग प्रकरणी कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रात्री गडचिरोलीत मुक्काम; देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा आज ऐतिहासिक सोहळा, पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रात्री गडचिरोलीत मुक्काम; देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा आज ऐतिहासिक सोहळा, पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार
तुम्ही ई-पीक पाहणी केलीय का? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला मोठा निर्णय 
तुम्ही ई-पीक पाहणी केलीय का? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला मोठा निर्णय 
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget