एक्स्प्लोर

Avinash Bhosale Arrest : पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

Avinash Bhosale Arrest : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले  यांना DHFL प्रकरणी  सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे

पुणे :  पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना DHFL प्रकरणी  सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.  गेल्या महिन्यात  अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयनं छापेमारी केली होती.  डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे - मुंबई परिसरात छापेमारी केली होती त्यानंतर अखेर आज त्यांना सीबीआयने अटक केली आहे.

एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी झाली होती. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी होती.

अविनाश भोसलेंवर  ईडीकडूनही कारवाई

 ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फेमा (FEMA Act)कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अविनशन भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये  हॉटेल वेस्टिन- पुणे  हॉटेल ली मेरिडियन- नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा  याचा समावेश आहे

अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. अविनाश भोसले हे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता.  अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती.

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Babanrao Taywade on Manoj Jarange Patil Protest: ना नवीन GR, ना लेखी आश्वासन, जरांगेंच्या उपोषण स्थगितीनंतर बबनराव तायवाडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारची भूमिका पाहता...
ना नवीन GR, ना लेखी आश्वासन, जरांगेंच्या उपोषण स्थगितीनंतर बबनराव तायवाडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारची भूमिका पाहता...
Laxman Hake: मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा; म्हणाले, 'मराठा नेत्याला ओबीसी आयुष्यात कधीच मतदान करणार नाहीत उलट...'
मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा; म्हणाले, 'मराठा नेत्याला ओबीसी आयुष्यात कधीच मतदान करणार नाहीत उलट...'
Pune Tukaram Mundhe FDA Actions: सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake: मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा; म्हणाले, 'मराठा नेत्याला ओबीसी आयुष्यात कधीच मतदान करणार नाहीत उलट...'
मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा; म्हणाले, 'मराठा नेत्याला ओबीसी आयुष्यात कधीच मतदान करणार नाहीत उलट...'
Manoj Jarange Patil Protest News: मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती
मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सकाळी 6 वाजता बीडमध्ये काय घडलं?
मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सकाळी 6 वाजता बीडमध्ये काय घडलं?
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
Embed widget