औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. कारण, अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या किंबहुना काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदाची माळ भाजपच्या एल.जी. गायकवाड यांच्या गळ्यात पडलीय. त्यामुळं औरंगाबाद जिल्हा परिषदेत अध्यक्ष काँग्रेसचा तर उपाध्यक्ष भाजपचा असं चित्र पाहायला मिळतंय.


अध्यक्षपदासाठी मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर आणि भाजप पुरस्कृत दिवयानी डोणगावकर यांना 30-30 अशी समान मतं मिळाली. पण चिठ्ठी काढून काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या. तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या गायकवाड यांना 32 तर महाविकास आघाडीच्या शुभांजी काजे यांना 28 मतं मिळाली आहेत. कोल्हापूर, नाशिकनंतर आता औरंगाबाद जिल्हा परिषद महाआघाडीने ताब्यात घेतली आहे.

अब्दुल सत्तार यांच बंड शमलं -
शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं होतं. राज्यमंत्रीपद दिल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. सोबत औरंगाबाद जिल्हा परिषद शिवसेनेकडे असावी, असंही त्यांचं म्हणणं होतं. मात्र, याठिकाणी काँग्रेचा उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हे नाराजी नाट्य संपलं असून अब्दुल सत्तार नाराज नसल्याचं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली होती. अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याची जबाबदारी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानुसार अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार राजीनामा देणार नाहीत, असं अर्जुन खोतकर यांनी बैठकीनंतर सांगितलं. औरंगाबाद जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेकडे ठेवावी यासाठी अब्दुल सत्तार आग्रही होते. मात्र, त्यांना स्थानिक नेत्यांनी काहीही विचारलं नाही, त्यामुळे सत्तारांची नाराजी होती.

सत्तार यांच्यावर खैरे नाराज - 

दरम्यान, शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या हातून गेलं, असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. शिवसेनेवर नाराज असलेल्या अब्दुल सत्तारांची समजूत काढण्यासाठी चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे नेते सत्तारांना भेटले. या भेटीनंतर खैरे म्हणाले की, त्यांनी (सत्तारांनी)मला सांगितलं की, मी उद्धव ठाकरेंसमोर राजीनामा फेकलाय. तरीदेखील मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो की, मी शिवसेनेचा नेता आहे, म्हणून तुम्हाला समजवायला आलो आहे. परंतु ते ऐकायला तयार नाही.

संबंधित बातम्या :

मंत्रिमंडळावर शरद पवारांचा वरचष्मा; ज्यांनी साथ सोडली, त्यांची मंत्रिपदे पवारांनी कापली?

अब्दुल सत्तारांचं बंड शमलं, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार; अर्जुन खोतकरांची माहिती

uddhav thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणूक लढवणार? | ABP Majha