औरंगाबाद : एका मनोरुग्ण महिलेला एक दोन नव्हे तर तब्बल 20 वर्षे एका झाडाला बांधून ठेवल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. राधाबाई कानडे असं या महिलेचं नाव आहे.

 
पतीने सोडून दिल्यानंतर आईकडेच राहणाऱ्या राधाबाईचं सुमारे 20 वर्षांपूर्वी मानसिक संतुलन बिघडलं. हातावर पोट असलेलं हे कानडे कुटुंब नंदीबैलाचे खेळ करतात. त्यामुळे फिरस्ती त्यांच्या आयुष्याचा भाग.अशा परिस्थितीत मानसिक रुग्ण असलेल्या राधाबाई कुठेही जाऊ नयेत म्हणून त्यांना कायम दोरीने बांधून घालावं लागतं.

 
इच्छा नसतानाही आपल्या मुलीला ही शिक्षा द्यावी लागत असल्यानं, राधाबाईंच्या आईने तिच्यावर उपचारासाठी मदतीची याचना केली आहे. औरंगाबादमधल्या काही सामाजिक संस्थांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.