औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यातून लोकांची फसवणूक करणाऱ्या संतोष उर्फ सचिन राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. तीस-तीस योजनेत लोकांकडून गुंतवणूक करुन साठेअठरा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप राठोडवर आहे. दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधी रुपयांत असण्याची शक्यता आहे. 30-30 योजनेत लोकांकडून गुंतवणूक केल्याची कबुली संतोष राठोडनं एबीपी माझावर दिली होती.
संतोष उर्फ सचिन राठोड ला पोलिसांनी घेतलं ताब्यात रात्री उशिरा कन्नड येथून घेतलं ताब्यात. काल बिडकीन पोलिस ठाण्यास साडे अठरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोषवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील शेकडो शेतकरी, अधिकारी, राजकीय नेत्यांनी या तीस-तीस योजनेत पैसे गुंतवणूक केली होती. वर्षभरापासून या योजनेचा मास्टरमाईंड संतोष उर्फ सचिन राठोड पैसे परत देतो म्हणून टाळाटाळ करत होता. तर काही दिवस यो फरार सुद्धा झाला होता. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात कृष्णा राठोड, पंकज चव्हाण आणि संतोष राठोड विरोधात गुन्हा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..18 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालीय. त्र या घोटाळ्याची व्याप्ती करोडो रुपयात असण्यात शक्यता आहे.
'तीस-तीस' घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला होता. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा नंतर फिर्यादीनं मागे घेतला. आता राठोड हा औरंगाबादमध्ये दिसून येत नाही, असं सांगितलं जात आहे.
'तीस-तीस' घोटाळा काय?
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम या तरुणाने केलं.
काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 10 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळं हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होतेय.
इतर महत्वाच्या बातम्या