Weather Forecast : मुंबई (Mumbai), पुणे (Pune) सह महाराष्ट्रात काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. शनिवारी आणि रविवारी मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी घट झाली आहे. 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात झाली आहे. तर खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असल्याचं चित्र आहे. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 22 आणि 23 जानेवारीला मुंबई, पुण्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.






 


शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर रविवारी पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha