एक्स्प्लोर
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, फेसबुक पोस्ट लिहून रेल्वेसमोर उडी
फेसबुक पोस्ट पाहून त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, पण त्याचा तपास लागला नाही.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुकुंदवाडी इथे राहणाऱ्या प्रमोद होरे पाटील या 31 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे प्रमोदने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर मराठा आरक्षण मिळावं, यासाठी आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती. प्रमोद होरेने काल (29 जुलै) दुपारी ही पोस्ट टाकली होती. फेसबुक पोस्ट पाहून त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, पण त्याचा तपास लागला नाही. अखेर रात्री बाराच्या सुमारास प्रमोदचा मृतदेह आढळला.
प्रमोद होरे गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. सतत येणाऱ्या अपयशाने तो दुखी होता. विज्ञान शाखेत पदवीधर असलेल्या प्रमोद विवाहित होता. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. शिवाय त्याला एक मोठा भाऊ असून तो गतिमंद असल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो खचला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तो आंदोलनात सक्रीय होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं आणि मित्राचं म्हणणं आहे.
प्रमोद होरे गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. सतत येणाऱ्या अपयशाने तो दुखी होता. विज्ञान शाखेत पदवीधर असलेल्या प्रमोद विवाहित होता. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. शिवाय त्याला एक मोठा भाऊ असून तो गतिमंद असल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो खचला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तो आंदोलनात सक्रीय होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं आणि मित्राचं म्हणणं आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























