एक्स्प्लोर

ना शारिरीक चाचणी, ना लेखी परीक्षा, तरीही पोलिस भरतीत अव्वल

औरंगाबाद: पोलिसात भरती होण्यासाठी कोण-कोण काय करेल हे सांगता येत नाही. नाशिकमध्ये कमी उंची असलेल्या उमेदवाराने विग घातला होता, अकोल्यात डोक्यावर पॅकिंग क्लीप चिकटवली होती, तर औरंगाबादमध्ये उमेदवाराने चक्क पायाला नाणे चिकटविले होते. आता तर औरंगाबाद पोलीसांनी ना शारिरीक, ना लेखी परिक्षा तरीही पोलीस भरतीमध्ये मेरीटमध्ये पास करणाऱ्यांचं एक रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. पोलिसांनी तरुणांची एक टोळी जेरबंद केली आहे. या उच्चशिक्षीत तरुणांनी आख्या ठाणा पोलीसांना उल्लू बनवले आहे. यातील तेजराव साबळे आणि भारत रुपेकर हे दोन तरुण, कोणतीही शारिरीक किंवा लेखी परिक्षा न देता ठाणे आयुक्तालयात पोलीस भरती प्रक्रीयेत अव्वल आले आहेत. हे सर्व तरूण औरंगाबाद शहराजवळील काद्रांबाद गावातील आहेत. तेजराव साबळे आणि भारत रुपेकर यांनी ठाणे आयुक्तालयात पोलिस भरतीसाठी अर्ज केला. तेजराव साबळे यांनी शारिरीक चाचणीसाठी झनक चरांडेला उभा केलं, तर लेखी परिक्षा राजू नागरे नावाच्या तरुणानं दिली. तर भारत रुपेकर याची शारिरीक चाचणी वाहब नवाब शेखने, तर लेखी परिक्षा दत्ता नलावडेने दिली. यासाठी शारिरिक चाचणी देणाऱ्या तरुणांना प्रतेकी 1 लाख मिळाले, तर लेखी देणाऱ्या तरुणांना साडेतीन लाख मिळाले. या तरुणांच्या टोळक्यानं यासाठी अत्याधुनीक यंत्रणेचाही वापर केला. यातील लेखी परिक्षा देणारे दत्ता नलावडे आणि राजू नागरे हे एमपीएससी परिक्षेची तयारी करणारे तरुण आहेत. यातील भारत रूपेकर नावाचा तरूण फरार आहे पोलीस खात्यात कुठलीही शारिरीक चाचणी, लेखी परिक्षा न देता पोलीस भरतीमध्ये अव्वल येण्याचं यश मिळवणाऱ्या या तरुणाच्या पराक्रमामुळे, ठाणे पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कारण हे डिवाईस आणि मोबाईल परिक्षा केद्रांपर्यंत पोहोचला कसा? शारिरिक चाचणी, लेखी परिक्षा देताना वेगवेगळे अमेदवार आले कसे? त्यांचे आयकार्ड कसे तयार झाले? याच ठाणे पोलीसातील काही अधीकारी यांच्यासोबत सहभागी आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी पोलीस भरती प्रक्रीया पारदर्शक केली. त्यामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी मुलं पोलीसात भरती झाली. मात्र या उच्च शिक्षित तरुणांनी त्यातही गैरमार्ग शोधलाच आणि त्याचमुळे त्यांच्या हातात बेड्या आहेत. मुंबईतही डमी परिक्षार्थी उभा केल्यानं औरंगाबादच्या एका तरुणाला अटक केली आहे. त्यामुळे  या तरूणांच्या टोळक्यानं आणखी किती मुलं अशाप्रकारे पोलीस खात्यात घुसवली आहेत, यांचा औरंगाबाद ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget