Aurangabad Crime News: पोटच्या मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केला, त्यानंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी नराधम बापाला जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी 18 महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनेकदा आरोपीला मुलीच्या आईने आणि स्वतः पीडिताने समजून सांगितल्यावर देखील, त्याच्याकडून होणारा त्रास काही बंद होत नव्हता. त्यामुळे पीडिताच्या तक्रारीवरून याप्रकरणी 2021 मध्ये औरंगाबादच्या एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणात 20 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, घटनेच्या सुमारे पाच वर्षांपूर्वी पीडिता 16 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून विनयभंग केला होता. ही बाब पीडितेने आईला वेळोवेळी सांगितली, मात्र आईल विश्वास ठेवत नव्हती. दरम्यान पीडिता दहावीत असताना नराधम पित्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने आईला याबाबत सांगितले. त्यावेळी पीडितेच्या आईने व पीडितेने आरोपीला समजावून सांगितले. मात्र काही दिवस शांत राहून त्याने पुन्हा अश्लील चाळे सुरू केले. पीडितेच्या आईने आरोपी पतीला अनेकदा समजावून सांगितले, मात्र तो ऐकत नव्हता. त्यामुळे 3 मे 2021 रोजी पीडितेने बापाविरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली.
पोलिसात गुन्हा दाखल...
दरम्यान 6 मे 2021 रोजी दुपारी पीडिता स्वयंपाक करत होती, तर पीडितेची आई व लहान भाऊ दुसऱ्या खोलीत बसलेले होते. स्वयंपाकघरात अचानक आरोपी आला व त्याने पीडितेचा विनयभंग केला. घाबरलेल्या पीडितेने मोठ्याने आरडाओरडा केल्याने पीडितेची आई तेथे आली. आईने आरोपीला समजावून सांगितले. मात्र, आरोपीने ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे अनकेदा सांगून देखील आरोपीचे चाळे सुरूच असल्याने, अखेर पीडीत मुलीने आईसह एमआयडीसी वाळूज ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा...
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावर या प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक निरीक्षक प्रीती फड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम 354 (अ) अन्वये 18 महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: