एक्स्प्लोर

'नोकरीसाठी 35 लाख भरलेत, कॉपी करु द्या, नाहीतर आत्महत्या करेन'

नोकरीसाठी 35 लाख रुपये भरले आहेत, कॉपी करु द्या, अन्यथा आत्महत्या करेन, अशी धमकी औरंगाबादमध्ये बीएडच्या विद्यार्थ्याने दिली.

औरंगाबाद : कॉपी करताना पकडलेल्या तरुणाचा आक्रस्ताळेपणा औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला. नोकरीसाठी 35 लाख रुपये भरले आहेत, कॉपी करु द्या, अन्यथा आत्महत्या करेन, अशी धमकी परीक्षार्थीने दिली. धक्कादायक म्हणजे हाच तरुण पुढे शिक्षक होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. 27 एप्रिलपर्यंत या परीक्षा चालणार असून शनिवारी विज्ञानातील understanding discipline and pedagogy of school subject science विषयाचा पेपर होता. डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन, नवखंडा या परीक्षा केंद्रावर एम थ्री हॉलमध्ये पेपर सुरु होता. सकाळी 11 वाजून 10 मिनिटं झाली असताना एका विद्यार्थ्याला पर्यवेक्षकांनी कॉपीसह पकडलं. खात्री करण्यासाठी उत्तरपत्रिका जमा केल्यावर विद्यार्थ्याने थेट धमकीच दिली. नोकरीसाठी मी 35 लाख रुपये भरले आहेत. मला ही परीक्षा पास होणं आवश्यक आहे. कॉपी करु द्या, प्रश्नांची उत्तरं पाहून लिहू द्या अन्यथा कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करेन, अशी धमकी देत हा परीक्षार्थी पळत सुटला. त्यानंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी समजावत त्याला परत वर्गात आणून बसवलं आणि शांत केलं. कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू जेमतेम दहा दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये कॉपी करताना पकडल्याने व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारली होती. उपचारादरम्यान दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget