कोल्हापूर : कर्ज फेडता येत नसेल, तर आई आणि बायकोला विक अशी मुजोरी आरबीएल बँकेच्या वसुली अधिकाऱ्याने केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कोल्हापुरातील ही घटना आहे.


बँक अधिकारी आणि कर्जदार यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

कोल्हापुरातील पोतदार यांनी आरबीएल बँकेकडून कर्ज घेतलं होतं. घेतलेल्या कर्जाची वसुली करताना कर्ज फेडता येत नसेल तर तुझ्या आईला आणि बायकोला विकून कर्ज फेड, असा अजब सल्ला बँकेच्या महिला वसुली अधिकाऱ्यांनी दिला.

हे प्रकरण 24 एप्रिल 2018 रोजीचं आहे. मात्र हा ऑडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपची सत्यता एबीपी माझाने पडताळलेली नाही.

ऑडिओ क्लिप :