उस्मानाबाद: बारावीचा निकाल जाहीर होऊन दोन दिवस झाले. मेडिकलाच्या प्रवेशाची धांदल सुरु झाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या शाखांत प्रवेश घ्यायचे आहेत. मात्र उस्मानाबादमध्ये तीन बहिणी अशा आहेत, त्यांचा प्रवास तुम्हाला प्रेरणादायी ठरेल.

या तीनही मुली मागासर्वीय समाजातल्या आहेत. आई- वडील नोकरीला. घरात मार्गदर्शनासाठी कोणी नाही. अशा वातावरणात तीनही मुलींनी एकमेकींची प्रेरणा बनल्या. तिघींही एमबीबीएस झाल्या आहेत. एवढचं नाही तर तिघीनींही महाराष्ट्रातल्या प्रतिथयश महाविद्यालयातून एमडीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

डॉक्टर स्वप्नाली...डॉक्टर स्वरुपा आणि डॉक्टर कांचन....एकाच घरातल्या तीन डॉक्टर बहिणी. एकमेकींच्या प्रेरणा बनून या मुलींनी स्वंय अध्यपन केलं...उस्मानाबाद शहरातल्या नूतन प्राथमिक विद्यालय आणि भोसले हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत या तिघी शिकल्या.

तिघींही बहिणी दहावी आणि बारवी मेरीटमध्ये उत्तीर्ण झाल्या. स्वप्नालीला सीईटीत २०० पैकी १७८, स्वरुपाला १८४ आणि कांचनला १६९ गुण मिळाले. तिघींनाही आरक्षणाशिवाय खुल्या वर्गातून सरकारी वैद्याकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत होता. स्वप्नाली सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून बालरोग तज्ज्ञ झाली. स्वरुपानं आयएसआयसीआय मुंबईतून बालरोग तज्ज्ञाची पदवी घेतली. कांचनने केईममधून स्त्रीरोग तज्ज्ञाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

या तिघी बहिणी शामराव बनसोडे आणि तारा वाघ यांच्या मुली आहेत. शामराव नगर पालिकेत कारकून होते. ताराताई सरकारी रुग्णालयात परिचारिका. पहिल्या आणि दुसऱ्या मुलीत 4 तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलीत 2 वर्षाचं अंतर होतं. तीनही मुली झाल्यानं टोमणे मारणाऱ्या नातलगांकडे दुर्लक्ष करून दोघांनी मुलींना डॉक्टर करण्याचं स्वप्न पाहिलं.

आईच्या निवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं हे कुटुंब एकत्रित आलं होते. मोठी स्वप्नाली आता नागपूरकर झाली आहे. नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. या दोघींही पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षा देण्याच्या विचारात आहेत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजबांधवांना शिकण्याचा सल्ला दिला होता.या तीनही मुली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या खऱ्या खुऱ्या वारसदार बनल्या आहेत.