सांगली : सांगलीतील पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातच दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ल्याचाही प्रयत्न केला.


दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या परिसरातील चंदनाची झाडं तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यावेळी त्यांना अडवायला गेलेल्या पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांकडून सत्तूर आणि करवत जप्त करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडल्याची माहिती आहे.