पुण्यात महाराष्ट्र एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2016 07:52 AM (IST)
पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले आहेत. गोंदियाला जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसचे इंजिनापासूनचे पहिले 3 डबे मंगळवारी रात्री 11.45 वाजता घसरले. पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 1 जवळ हे डबे घसरले आहेत. महाराष्ट्र एक्स्प्रेसचे घसरलेले डबे सोडून उरलेले डबे इंजिनाला जोडत गाडी प्लॅटफॉर्म 6 वरुन गोंदियाला मार्गस्थ करण्यात आली. रुळावरुन घसरलेले डबे हटवण्याचं काम क्रेनच्या मदतीने सुरु करण्यात आली आहे. नुकतेच मुंबईतील सीएसटी स्टेशनवर हुसेनसागर एक्स्प्रेसचे घसरले होते. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.