शिर्डी: साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीत लाखो भाविकांनी काल हजेरी लावली होती. दसऱ्यानिमित्त साईचरणी कोट्यवधींचं दान करण्यात आलं. मूळचे हैदराबादचे मात्र सध्या ऑस्ट्रेलियात राहणारे वेंकटा अटलुरी या भाविकानं साईंचरणी 22 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकूट अर्पण केला.


एका अज्ञात भाविकानं अडीच लाखांचा हिऱ्याचा ब्रोच अर्पण केला आहे. दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी साई संस्थाननं सर्वसामान्य भाविकांसाठी अनोखी भेट दिली आहे. त्यानुसार शिफारस देऊन मिळणारे व्हीआयपी दर्शन पास आता सर्व सामान्यांसाठी खुले होणार आहेत. तर एक वर्षाहून लहान बाळ असलेल्या कुटुंबाला आणि वयोवृद्ध नागरिकांना शिर्डीत झटपट दर्शन दिलं जाणार आहे.

तसेच थोड्याच दिवसात साई अॅम्ब्युलन्स नावाने अल्पदरात रूग्णसेवा राज्यात सुरू होणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली आहे.