एक्स्प्लोर

मराठमोळ्या अतिश दाभोलकरांच्या हाती इटलीच्या नामांकित ICTP ची धुरा

डॉ.दाभोलकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य झोकून देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे काका होते. त्यांचे वडील श्रीपाद दाभोलकर यांनीदेखील ‘प्रयोग परिवार’च्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले आहे.

मुंबई : नोबेल पारितोषिक विजेता असलेल्या अब्दुस सलाम यांनी स्थापन केलेल्या ICTP ह्या इटलीतील नामांकित संस्थेचे संचालक म्हणून अतिश दाभोलकर यांची निवड करण्यात आली आहे. युनेस्कोच्या सहायक संचालकाच्या समकक्ष हे पद आहे. 56 वर्षीय दाभोलकर हे ‘युनेस्को’चे सहायक महासंचालक या श्रेणीने नोव्हेंबरपासून या पदाची पाच वर्षांसाठी धुरा सांभाळणार आहेत. डॉ.दाभोलकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य झोकून देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे काका होते. त्यांचे वडील श्रीपाद दाभोलकर यांनीदेखील ‘प्रयोग परिवार’च्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले आहे. हार्वर्ड विद्यापीठात संशोधनकार्य केल्यानंतर त्यांनी 1996 साली भारतात येत 2010 पर्यंत ते मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ मध्ये सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे.  त्यानंतर फ्रान्समध्ये सोरबोन विद्यापीठ आणि ‘सीएनआरएस’मध्ये (नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च) ते 2007 पासून संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत. डॉ.अतिश दाभोलकर यांच्या कार्याने प्रभावित होऊन जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ.स्टीफन हॉकिंग स्वत: त्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात आले होते. 1995 साली डॉ.दाभोलकर यांनी  स्ट्रींग थिअरीवर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी हॉकिंग यांनी कॅलिफोर्नियात त्यांची भेट घेतली होती. काय आहे ICPT? नोबेल पुरस्कार विजेते अब्दुस सलाम यांनी 1964 मध्ये ‘आयसीटीपी’ची स्थापना केली आहे. मूलभूत संशोधनाबरोबर जगभर वैज्ञानिक क्षमता विकसित करण्यासाठी ‘आयसीटीपी’प्रयत्न करते. दरवर्षी जगभरातील ६००० हून अधिक वैज्ञानिक वेगवेगळ्या पातळीवरील वैज्ञानिक संशोधनासाठी तेथे भेट देतात.  इटालियन सरकार, आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा संस्था (आयएईए), आणि ‘युनेस्को’ यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार कार्यरत असणारी ‘आयसीटीपी’ ही युनेस्कोची प्रथम श्रेणीची संस्था आहे. अंनिसच्या कार्यात देखील सक्रीय सहभाग अतिश एक प्रतिभावंत शास्त्रज्ञ असून महाराष्ट्र अंनिसचे खंदे कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या नंतर जादूटोणाविरोधी कायदा पारित व्हावा म्हणून त्यांनी स्वत: प्रयत्न करून ACT NOW नावाची वेबसाईट स्वतः तयार करून चालवली होती. सोबतच दीडशेपेक्षा अधिक शास्त्रज्ञांचा पाठिंबा ह्या कायद्यासाठी मिळवला होता.    ICTP ह्या इटलीतील नामांकीत संस्थेचे संचालक म्हणून अतिश दाभोलकर यांची निवड करण्यात आली आहे.  खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, असे अंनिसचे हमीद दाभोलकर यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget