एक्स्प्लोर

Raj Thackeray | पायाभूत सुविधा हव्या असतील तर दलबदलूंना घरी बसवा : राज ठाकरे

राज्यातील खड्ड्यांचा मुद्दाही राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला. आज महाराष्ट्रात नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र खड्डे आहेत. नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती त्यावेळी आम्ही टक्केवारी बंद केली, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

भिवंडी : रस्ते, बरोजगारी, पक्षांतर करणारे नेते, पीएमसी बँक आणि सिटी को. ऑप बँकेतील घोटाळ्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. आज राज ठाकरेंची भिवंडीत प्रचारसभा पार पडली. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेने माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं नावही राज ठाकरेंनी यावेळी घेतलं.

काही विशिष्ट माणसं सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती राहणार नाही. आपण काम नाही केलं तरी लोक आपल्याला निवडून देणार, असा समज त्यांचा झाला आहे. विरोधी पक्षात असलेले नेतेच आज सत्ताधारी गोटात जाऊन बसले आहेत. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते पराभूत होणार नाहीत, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

पीएमसी आणि सिटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे काढता येत नाहीयेत. बँका बुडत आहेत, उद्योग बुडत आहेत, तरीही नागरिक गप्प का आहेत, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ सिटी कॉऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत. मात्र सिटी बँक बुडल्यानंतर खातेदारांनी अडसूळ यांची भेट घेतली. त्यावेळी अडसूळांनी 'मी काही करू शकत नाही, मरायचं तर मरा', असं उत्तर खातेदारांना दिलं असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज्यातील खड्ड्यांचा मुद्दाही राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला. आज महाराष्ट्रात नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र खड्डे आहेत. नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती त्यावेळी आम्ही टक्केवारी बंद केली. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे नाही पडले. याच कंत्राटदारांनी नाशिकमध्ये आमच्या काळात चांगले रस्ते बांधले कारण आम्ही टक्केवारी बंद केली, असा दावा राज ठाकरेंनी केला.

राज्य सरकार 30 % सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्योगधंदे बंद होत आहेत आणि सरकारी नोकऱ्याही कमी होत आहेत. आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget