मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम बदलून घेण्याची महाविकास आघाडीवर वेळ आली आहे. गुप्त मतदान झाले तर सरकारमधील आमदार आपला असंतोष दाखवतील याची सरकारला भीती आहे. राज्य सरकार घाबरलेलं आहे. सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर केली आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका करताना ओबीसी आरक्षण , अतिवृष्टीतील मदत, मुख्यमंत्र्यांची प्रकृती, भास्कर जाधव यांचे वक्तव्य अशा विविध विषयांवर भाष्य केले. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासठी होणाऱ्या निडणुकीत राज्य सरकारने केलेल्या बदलावरून फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये असंतोष आहे. गुप्त मतदान घेतले तर ते आपला असंतोष मतदानातून दाखवून देतील. त्यामुळे राज्य सरकार घाबरले आहे. या भीतीमुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बदल करण्यात आले आहेत अशी टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही, भाजपचा त्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. परंतु, ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नसतील तर एखाद्या मंत्र्याकडे त्यांनी आपला चार्ज द्यावा"
शेतकऱ्यांची वीज तोडण्याचं काम राज्य सरकारकडून केलं जात आहे. वीज तोडल्याले राज्यातील अनेक गावे अंधारात आहेत. असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यात अतिवृष्टी होवून खूप मोठा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नाही. राज्य सरकार फक्त जनतेची दिशाभूल करत आहे. राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला अशी सरकारची स्थीती झाली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भास्कर जाधव यांचं वक्तव्य लज्जास्पद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 लाख रूपये देणार असे कधीही म्हटलेलं नाही. परंतु, भास्कर जाधव यांनी त्यांची नक्कल करून आक्षेपार्ह वक्तव्य केले. भास्कर जाधव यांचं वक्तव्य आक्षेपार्ह आणि लज्जास्पद आहे. पंतप्रधानांची नक्कल करणं आणि आक्षेपार्ह
वक्तव्य करणं सहन केलं जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
... तर ओबीसी आरक्षण टीकले असते
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरूनही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ओबीसी आयोगाला आधीच पैसे दिले असते तर आरक्षण टिकले असते. आरक्षण रद्द झाल्यावर पैसे देणे म्हणजे वराती मागून घोडा, अशी टीका फडणवीस यांनी केली.
Devendra Fadnavis : राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी महाविकास आघाडीची परिस्थिती : फडणवीस
महत्वाच्या बातम्या