नागपूर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे अधिवेशनाला आले नाही. यात काही नवीन घडतय अस नाही. कारण, मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात किती वेळा आले? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलाय. आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत ठीक असून, ते सभागृहात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहीले नाहीत. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
मुख्यमंत्री ठाकरे यांची तब्बेत लवकर सुधारावी अशी मी प्रार्थना करतो. लवकर त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होऊन महाराष्ट्राच्या सेवेत ते परत यावेत असे दानवे म्हणाले. ते आज सभागृहात उपस्थित नाहीत, यामध्ये नवीन काही नाही. कारण ते मुख्यमंत्री झाल्यापासून किती वेळा मंत्रालयात आले? त्यांनी राज्यात किती दौरे केलेत? राज्यावर आलेल्या संकटाला ते किती वेळा सामोर गेलेत? असे सवाल दानवेंनी केलेत. राज्यात अतिवृष्टीचा विषय, मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा विषय असेल यामध्ये त्यांचा सहभाग नसतो. याच कारण म्हणजे तीन पक्षांचे असणारे सरकार. हे तीनही पक्ष एकत्र येऊन कोणताही निर्णय करत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री आले काय आणि नाही आले काय, या राज्यातील जनता संयमी असल्याचे दानवे म्हणाले.


संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित राहत नाहीत, असा आरोप विरोधकांनी केली होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोज सभागृहात उस्थित होते. आमचे सरकार सर्व विषयांवर चर्चा करायला तयार असल्याचे आम्ही विरोधकांना सांगितले. मात्र, विरोधी पक्षांनी शेवटपर्यंत गोंधळ घातला. आधारकार्ड लिंक, मतदार नोंदणी या बिलाला विरोधकांचा विरोध आहे. आठ वर्षांत केंद्र सरकारने कृषी, रेल्वे, उद्योग क्षेत्रासह अनेक विषयात चांगले काम केल्याचे दानवे म्हणाले.


दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आज ते विधानसभेत जाणार आहे का असेही पंतप्रधनांनी विचारल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. एकीकडे पंतप्रधान उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी करतात आणि दुसरीकडे राज्यात भाजपचे नेते त्यांच्या प्रकृतीवरुन वेगवेगळी विधाने करताना दिसत आहेत. अशातच आता दानवेंनी देखील ते मुख्यमंत्री झाल्यापासून किती वेळा मंत्रालयात आलेत असे विधान केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: