एक्स्प्लोर

56 इंचाच्या छातीचं शौर्य दाखवण्याची हीच खरी वेळ : अशोक चव्हाण

नागपूर : कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. 56 इंचाच्या छातीचं शौर्य दाखवण्याची हीच खरी वेळ आहे, असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात स्वाक्षरी मोहीम राबवली. मोदी सरकारने शर्थीचे प्रयत्न करत कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे पालिका निवडणुकांमध्ये झालेल्या शाईफेकीच्या प्रकरणानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मुंबईत आझाद मैदानात भाजपचं आंदोलन तर तिकडे मुंबईतील आझाद मैदानात भाजपने पाकिस्तानविरोधात आंदोलन केलं. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून भाजपने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या निर्णयाचा निषेध केला. पनवेलमध्ये पाक राष्ट्रध्वज जाळून मनसेचा निषेध पनवेलमध्येही मनसेने पाकिस्तान सरकारचा पुतळा आणि राष्ट्रध्वज जाळून निषेध व्यक्त केला. पनवेलच्या गार्डन हॉटेलसमोर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरातील शिवसेनेकडून पाकिस्तानी राष्ट्रध्वजाची होळी तर कोल्हापुरातील शिवाजी चौकात शिवसेनेने पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी केली. पाकिस्तानविरोधी घोषणांनी हा परिसर दणाणून निघाला होता. कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा 'रॉ'चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोण आहेत कुलभूषण जाधव? कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती. संबंधित बातम्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget