एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र, आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहिम

मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद आरक्षणाची 50 टक्के मर्यादा संसदेत घटना दुरूस्ती करून शिथिल करण्यात यावी, अशी मागणी अशोक चव्हाण सातत्याने मांडत आले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. 

अशोक चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांचे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले असून, या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता विषद केली आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी दिलेला निकाल व त्याअनुषंगाने निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुनःश्च राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या संसदेच्या मान्सून अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता आहे. 

परंतु, एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार केंद्र वा राज्य कोणाकडेही असले तरी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा कायम राहिल्यास मराठा आरक्षण तसेच देशातील बहुतांश राज्यांना नवीन आरक्षण देणे शक्य होणार नाही. कारण तेथील आरक्षणे अगोदरच 50 टक्क्यांच्या वर गेलेली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना देणे पुरेसे नाही, तर विविध न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद असलेली आरक्षणाची 50 टक्के मर्यादा आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून शिथिल करणे महत्त्वपूर्ण आहे. मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगाने हे आवश्यक असल्याचे अशोक चव्हाण यांनी खासदारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 

आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयीन पातळीवर केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी खासदारांना दिली आहे. परंतु, या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नसल्याने आता केंद्र सरकारने याबाबत संसदेच्या पातळीवर विचार करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने 8 जून 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीत घेतलेल्या भेटीमध्ये इंद्रा साहनी निवाड्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादेची बाधा व त्याचे परिणाम निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करावी, अशी मागणीही केली. मराठा आरक्षणासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यावर सहकार्य म्हणून राज्य शासनाला केंद्र सरकारकडून संसदेच्या पातळीवर उचित कार्यवाहीची अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद आरक्षणाची 50 टक्के मर्यादा संसदेत घटना दुरूस्ती करून शिथिल करण्यात यावी, अशी मागणी अशोक चव्हाण सातत्याने मांडत आले आहेत. राज्य विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या मान्सून अधिवेशनात 5 जुलै 2021 रोजी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्राला शिफारस करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर त्यांनी नवी दिल्ली येथे जाऊन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार पी. चिदंबरम, शिवसेना नेते संजय राऊत आदींची भेट घेऊन सदरहू विषय संसदेत मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी आता सर्व खासदारांना पत्र लिहून या मोहिमेला अधिक गती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ

Embed widget