एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दानवेंवर टीका करताना अशोक चव्हाणांचीही जीभ घसरली
मालेगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत चव्हाण यांच्या भाषेची पातळी घसरली.
काही दिवसांआधी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. त्याच वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी टीका करताना अशोक चव्हाण यांनीही भाषेची मर्यादा ओलांडली. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मालेगावमध्ये 24 तारखेला होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हिंदी भाषेतून भाषण करत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे सरकार नसून सावकार असल्याची टीका करत हे सरकार गरीबांना लुटण्याचं काम करीत असल्याचा घणाघात अशोक चव्हाणांनी केला.
एमआयएम, समाजवादी पक्ष हे भाजपची बी टीम असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपला मदतीसाठी हे पक्ष निवडणुकीत उतरले असून भाजपला रोखण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे. त्याची सुरुवात मालेगावमधून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाहा व्हिडिओ :
संबंधित बातम्या :
दानवेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं मौन!
शेतकऱ्याला मानवाकडून अपेक्षा, दानवाकडून नाही : राज ठाकरे
…तर शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो : रावसाहेब दानवे
बेताल बरळणाऱ्या दानवेंवर विरोधकांची तोफ
दानवेंच्या तोंडाला काळं फासा, 50 हजार रुपये मिळवा, मनसेची घोषणा
‘दानवे पदावर राहणं विरोधकांच्या फायद्याचं’, शरद पवारांचा खोचक टोला
शेतकऱ्यांना मानवाकडून अपेक्षा, भाजपच्या दानवाकडून नाही : राज ठाकरे
‘कर्जमाफी नको, दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा’
दानवेंच्या तोंडाला काळं फासा, 50 हजार रुपये मिळवा, मनसेची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्रीडा
क्रिकेट
धाराशिव
Advertisement