Ashish Shelar मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सामनातील अग्रलेखातून भाजपा आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांचा उल्लेख त्यांनी 'पत्रकार पोपटलाल' असा केला आहे. 


आशिष शेलार म्हणाले की, पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख आज सामनामध्ये आला आहे. तो अग्रलेख आहे की हग्रलेख आहे. ते रात्री बसतात आणि सकाळी लिहितात. या बांडगुळ पक्षांना दिल्ली भाजपने जागा दाखवली आहे. संजय राऊत आता तुमच्या पक्षाला बैठकीसाठी नॅनो गाडी लागेल, अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.  


...त्यावेळी मनोज जरांगे गप्प का?


मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आशिष शेलार म्हणाले की, मराठा समाजाला हे मान्य नाही, अशी भाषा मराठा समाजाला मान्य नाही. जे बोलतात त्या मागे स्क्रिप्ट कोणाची आहे? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) काळात आरक्षण गेले त्यावेळी तुम्ही गप्प का बसता? शरद पवार (Sharad Pawar) इतकी वर्षे आरक्षण देऊ शकले नाही त्यावेळी गप्प का बसला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 


आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला


उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बाजू नीट लावली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण गेले होते. मराठा समाजाच्या प्रत्येक मागण्याचा सरकार विचार करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय बगळे आवाज काढत आहेत. अशांना बाजूला सारण्यासाठी मुंबईकर तयार आहेत, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) लगावला आहे. 


मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद


मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरात आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी एसटी बस पेटवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.


आणखी वाचा 


Vijay Wadettiwar : 'जरांगेंना असं बोलायला लावणं, हे पाप कुणाचं आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही' वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा