Sujay Vikhe On NCP : "राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिन्ह चुकले, तुतारी नव्हे यांना खंजीर भेटायला हवे होते" असं म्हणत भाजप खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe) राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सुजय विखेंच्या दिल्ली वाऱ्या का वाढल्या आहेत? असं म्हणत सुजय विखेंवर निशाणा साधला होता. याबाबत विचारले असता सुजय विखेंनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.
सुजय विखेंना राम शिंदेंकडून वारंवार आव्हान
अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी सुजय विखेंना त्यांच्याच पक्षातील आ. राम शिंदे यांच्याकडून वारंवार आव्हान दिले जात आहे आपण देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे राम शिंदे म्हणतात, यावर बोलताना सुजय विखे म्हणाले, प्रत्येक मनात अपेक्षा आणि आकांक्षा असणं चुकीचं नाही. मी खासदार आयुष्यभर राहील असं मी कधी म्हंटलेलो नाही. नगर दक्षिण लोकसभेच्या जागेचा निर्णय काय जिल्हा स्तरावर होणार नाही, केंद्र स्तरावर निर्णय होईल आणि ज्यांना कुणाला संधी मिळेल, ते पंतप्रधान मोदींसाठीच काम करेल असं सुजय विखेंनी म्हटंलय.
'तुतारी वाजेल की हवा निघेल हे...'
निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले. यावर यापूर्वी सुद्धा सुजय विखे-पाटील यांनी निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, "मशाली घ्या तुतारी वाजवा. हवं तर त्यांना नव्या तुतारी देखील घेऊन देऊ. मात्र, आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पहाव लागेल, असे म्हणत विखे पाटलांनी शरद पवार गटाला डिवचलं होतं. त्यानंतर आता रोहित पवारांच्या प्रतिक्रियेनंतर सुजय विखेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षचिन्हावर टीका केलीय. सुजय विखे म्हणाले होते, चिन्ह देणं हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतलं गेले आहे. मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जो पर्यत बैलेटवर चिन्ह येत नाही तो पर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही, असे सुजय विखे पाटील म्हणाले होते.
हेही वाचा>>>
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी