जालना : मनोज जरांगे मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम असून, पुढील दोन तासांत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत. "आम्हाला येऊ द्यायचा प्रयत्न केला जात आहे. रात्रीच संचारबंदीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे. संचारबंदी लावली किंवा काहीही केलं तरीही सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी करून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मात्र, आंदोलकांनी पोलिसांना त्रास देऊ नयेत, असे आवाहन जरांगे यांनी केले आहेत.
रात्री आमच्यासोबत साडेतीनशे गाड्या होत्या. आमच्यासोबत महिला होत्या. रात्रीच आमच्यावर हात उचलण्याचा डाव होता,पण आम्ही तो हाणून पाडला आहे. तसेच हे सर्व काही फडणवीस करायले लावत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 'तू चूक केली आहे, तू मला सागर बंगल्यावर आमंत्रण दिले होते. संचारबंदी लावल्याने सुट्टी आहे असे तुला वाटत असेल तर सुट्टी नाही. अजूनही मराठ्यांची लाट उसळू नको, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
आपल्यासोबत दगाफटका करणे एवढे सोपं नाही
पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसार आम्ही परत आंतरवालीत परत आजत आहोत. त्या ठिकाणी आम्ही बैठक घेऊन पुढचा निर्णय घेणार आहोत. त्या ठिकाणी मी उपचार घेणार आहे. संचारबंदी असल्याने सर्वांनी आपापल्या गावाकडे जावे. आपल्यासोबत दगाफटका करणे एवढे सोपं नाही. त्यामुळे राज्यभरातील मराठा आंदोलकांनी शांत राहावे असे आवाहन जरांगे यांनी केले आहेत.
अंबड तालुक्यात संचारबंदी
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगेंच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मनोज जरांगे सध्या भांबेरी गावात असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
मनोज जरांगे मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तर, अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली असल्याने या ठिकाणी अनेक भागात नाका बंदी लावण्यात आली आहेत. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी