एक्स्प्लोर
Advertisement
देशभरात सर्वात आधी भगवा संघानं फडकवला : आशिष शेलार
मुंबई : देशभरात भगवा संघाच्या माध्यमातून डॉ हेडगेवारांनी फडकवला, असा दावा भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. तसंच शिवसेनेआधी हिंदूत्व ही भाजपची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वरील विशेष चर्चेत ते बोलत होते.
युतीबद्दल भाजप सकारात्मक
मुंबई महापालिकेत युती झाली तर ती फक्त पारदर्शकतेच्य़ा मुद्द्यावरच होईल, अस मत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे. पारदर्शकतेचा मुद्दा फक्त मुंबईतच नाही तर सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिकांमध्ये लागू असेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
युती झाल्यास जो पक्ष जिथे जिंकेल ती यादी देणं आवश्यक आहे. भाजपची यादी तयार आहे, मात्र शिवसेनेनं यादी दिली नसल्यानं युतीची बोलणी थांबल्याचं शेलारांनी सांगितलं आहे.
2014 साली मोदी लाटेमुळे भाजप सत्तेत आलं, पण त्यानंतरही भाजप अनेक ठिकाणी सत्तेत आलं. त्यामुळे जनता कुणासोबत आहे हे समोर आलं, असं शेलार म्हणाले. ती सध्या काय करते असा प्रश्न अनेकजण विचारतात, पण ती सध्या युतीचा सकारात्मक विचार करते असा टोलाही त्यांनी सेनेला लगावला. त्यावेळीच आम्ही सेनेवर टीका करत नाही, जेव्हा सेना टीका करते तेव्हा आम्ही प्रत्यूत्तर देतो असंही त्यांनी कट्ट्यावर सांगितलं.
LIVE UPDATES
बाळासाहेबांचं असणं युतीला पुरक झालं असतं, बाळासाहेबांची उणीव य़ुती करताना दिसते
मुंबईकरांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर, बाळासाहेब आज असते तर अशी वेळ आलीच नसती : आशिष शेलार
प्रश्न कंत्राटदारांना विचारला जातो, मात्र उत्तर स्थायी समिती अध्यक्ष देतो : आशिष शेलार
मुंबई महापालिकेत कारभारावर त्रुटी आहेत, आता पारदर्शक शासन येणं आवश्यक
2014 नंतर पारदर्शक मुख्यमंत्री आले आहेत, त्यामुळे ज्याठिकाणी घोटाळा होता त्यांच्यावर कारवाई व्हावी असे आदेश दिले आहेत
मित्रपक्षानं टीका केली की आम्हीही करतो : आशिष शेलार
आज ती काय करते, तर युतीसाठी सकारात्मक तयारी ठेवते : आशिष शेलार
2014 च्या निवडणुका मोदी लाटेत झाला असं सगळे म्हणतात, मात्र त्यावेळी मतदार कुणासोबत आहेत हे कळालं : आशिष शेलार
जो पक्ष जिथे जिंकेल ती यादी एकमेकांना देणं अपेक्षित, भाजपची यादी तयार आहे : आशिष शेलार
पारदर्शकतेचा मुद्दा केवळ महापालिकेसाठी नाही, तर राज्यातील सर्वच ठिकाणी
देशभरात सर्वात आधी भगवा संघानं फडकवला : आशिष शेलार
आज युतीसाठी शेवटची बैठक, मात्र युतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील : आशिष शेलार
आगामी निवडणुकीत प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व देणार, हिंदू ही जगण्याची पद्धत आहे, त्यामुळे आम्ही इतरांना वेगळं मानत नाही : आशिष शेलार
मुंबईत राहणारे सारे सारखेच, त्यामुळे समाजाच्या आधारावर मतं मागणं चुकीचं : आशिष शेलार
बाळासाहेब असते तर युतीत काही अडचण आली नसती : आशिष शेलार
मागच्या वेळी युती खडसेंनी तोडली नव्हती, त्या पक्षानं तोडली होती : आशिष शेलार
भाजपचा नारा हा लेस कॅश हा आहे, निवडणुकीतील खर्चाचा हिेशेब देण कार्यकर्त्यांना बंधनकारक : आशिष शेलार
रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहे, त्यांच्या मागण्यांचा विचार करु : आशिष शेलार
भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही असा विश्वास, युतीसाठी प्लॅन बी तयार : आशिष शेलार
मुंबईतील आरक्षित भूखंड वाटण्याचं काम आघाडी सरकारनं केलं, आमच्या सरकारनं या साऱ्या गोष्टी बंद केल्या आशिष शेलार
काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात मोठे घोटाळे, त्यांच्यामुळेच मुंबईचं वाटोळं झालं : आशिष शेलार
युतीतील वादाचा काँग्रेसला फायदा होणं शक्य नाही, काँग्रेसनं वाटोळं केलं : आशिष शेलार
युतीमध्ये राहुन एकमेकांविषयी वाईट बोलू नये हा बाळासाहेबांच तत्व : आशिष शेलार
सेना भाजपमध्ये भांडण नाहीत, पण कधीकधी आम्ही मोठ्यानं बोलतो : आशिष शेलार
कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची यंत्रणेत बदल अपेक्षित
भाजप परिवर्तनवादी पक्ष, मात्र गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं परिवर्तन त्यांच्यावर अवलंबून : आशिष शेलार
भाजप जनतेचा पक्ष आहे, हा पक्ष विचारधारेचा आहे : आशिष शेलार
धोरण म्हणून गुंडांना पक्षात प्रवेश देणार नाही, पालकमंत्र्यांना तसे निर्देश : आशिष शेलार
देशात सर्वप्रथम भगवा फडकवण्याचं काम डॉ हेडगेवारांचं : आशिष शेलार
भाजप हा एकमेव लोकशाहीनं चालणारा पक्ष, घराणेशाहीला इथं स्थान नाही आशिष शेलार
ज्यांचे हात केबलमध्ये आहेत त्यांनी पारदर्शकतेबद्दल बोलू नये : आशिष शेलार
ज्यावेळी देवेंद्रजी ठरवतील तेव्हा मुंबईबाहेर पडेन : आशिष शेलार
भाजपचे कार्यकर्ते एक विचारधारा घेऊन जात आहेत, मात्र याला कुणी विरोध समजू नये : आशिष शेलार
बाळासाहेबांचं असणं युतीला पुरक झालं असतं, बाळासाहेबांची उणीव य़ुती करताना दिसते : आशिष शेलार
मुंबईकरांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर, बाळासाहेब आज असते तर अशी वेळ आलीच नसती : आशिष शेलार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बॉलीवूड
विश्व
मुंबई
Advertisement