एक्स्प्लोर

अमित शाह आणि नरेंद्र मोदी समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील : आशिष शेलार

आशिष शेलार यांनी गेले काही दिवसांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : अमित शाह आणि नरेंद्र मोदी समजण्यासाठी संजय राऊत यांना बरेच जन्म घ्यावे लागतील असा टोला  भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावला. तसेच ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मुंबईत भाजपची कार्यकारिणी बैठक सुरु आहे. त्यावेळी शेलारांनी पत्रकारांशी संवाद साधला. आशिष शेलार यांनी गेले काही दिवसांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य रोज सकाळी आपण टीव्हीवर पाहतोय. संजय राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता एक अदृश्य शक्ती मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा पक्षाच्या निर्णयाबद्दल बोलतात तेव्हा एकाच सुरात बोलतात तेव्हा त्यांच्यात कुठलाही विसंवाद नसतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना समजण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. त्यातच संजय राऊत यांचा शुक्रवारी (15 नोव्हेंबर) वाढदिवस असतानाच वयासोबत त्यांच्या विचारांची परिपक्वताही वाढावी, असाही टोमणा शेलार यांनी दिला. उद्यापासून आमचे सगळे आमदार आणि खासदार अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार असल्याच शेलार यांनी सांगितले. पूर्वी मातोश्रीमधून राज ठाकरेंना भेटण्यासाठीही कुणी जात नव्हतं. मात्र आता माणिकराव ठाकरेंना भेटण्यासाठी जाण्याची वेळ आली. तिन्ही पक्षांचं सुरु असलेलं नाटक महाराष्ट्र पाहत आहे. सत्तेच्या हव्यासापोटी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी ओढ लागली आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेत्यांना मातोश्रीवर बोलवलं जायचं आता यांनाच चर्चेसाठी बाहेर पडाव लागत आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget