Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वांच्या  सुखासाठी प्रार्थना करत वारकरी  पंढरीच्या दिशेनं जात आहेत. माऊलींच्या पालखीचा आज  माळशिरस  येथे  मुक्काम असणार आहे.  तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सोलापूरात प्रवेश केला.  अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात  येथे असणार आहे.

  


तुकाराम महाराजांचे तिसरे रिंगण


तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण अकलूज शहरातील सदाशिवराव माने शाळेच्या प्रांगणात पार पडलं. अकलूज येथे ही दिंडी आली असता, काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सोहळ्यात सहभागी झाले. पटोले वारकऱ्यांच्या वेशात आले. डोक्यावर पांढरीशुभ्र टोपी. कपाळावर अष्टगंध आणि बुक्का, गळ्यात टाळ, वारकऱ्यांनी सुरू अभंग सुरू करताच पटोलेंची पावले यावेळी थिरकली. ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात त्यांनीही या भक्तिरसाचा आनंद लुटला. माळशिरसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान संपन्न झालं. कोरोनामुळं गेली दोन वर्ष मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत नीरा स्नान सोहळा उरकावा लागला होता. मात्र यंदाची आषाढी कोरोना निर्बंधमुक्त असल्यानं यावर्षी नीरा स्नानासाठी वारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 


 माऊलींची पालखी आज माळशिरस येथे मुक्कामी 


संत ज्ञानेश्वरांची पालखी नातेपुते येथून निघून माळशिरसला मुक्कामी थांबणार. पुरंदवडे येथे पालखीचे पहिले गोल रिंगण पार पडले.


कोरोनामुळे गेली दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. गावागावांत वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता सर्व वारकऱ्यांना पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे.


संबंधित बातम्या :



Ashadhi Ekadashi: वारकर्‍यांसाठी सातशे महिलांनी बनविले 65 हजार लाडू; अकरा वर्षांची परंपरा कायम


Ashadhi Ekadashi 2022 : आषाढीसाठी 2 वर्षानंतर विठ्ठलाच्या लाडू प्रसादाची विक्री सुरु, लाडू बनविताना भाविकांच्या आरोग्याची ऐशीतैशी