Ashadhi Wari 2022 Pandharpur :  जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या (Saint Tukaram Maharaj)  पालखीचे आषाढी वारीला ( Ashadhi Wari)  येत्या 20 जूनला प्रस्थान होणार आहे . संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचा अश्व हा पंढरपूरहून देहूकडे रवाना झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आजही जोपासली जाते. हा अश्व आज देहूकडे रवाना झाला आहे. 


 जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अश्व बारामतीतून पुढे देहूकडे पायी मार्गस्थ झाला. यावेळी अनेक भाविकांनी अश्वाची पूजा केली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील  विनायक नारायणराव रणेर यांचा मानाचा अश्व  आहे. या अश्वासह पंढरपुरहून देहूकडे पायी निघाले.  या अश्वाची पुजा लोक करत आहेत. हा मानाचा अश्व असून हा अश्व पालखी  सोहळ्यामध्ये सामील होणार आहे.


अनेक ठिकाणी सडा घालून आरती करण्यात आली. मानाच्या आश्वासनही सोबत असणाऱ्या वारकऱ्यांनी माऊलीचा गजर करत फुगडी खेळली. माऊलींचा मानाचा अश्व श्री क्षेत्र आळंदी येथे वीस जून रोजी पोचणार आहे . हा अश्व पालखी सोहळ्याच्या दरम्यान रोज सकाळी पालखीच्या जाऊन पाया पडतो  रिंगणात देखील हा  मानाचा अश्व धावतो. 


शेकडो वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अखंडितपणे पार पडतोय. यंदा हा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. कोरोना ओसरल्यामुळं सध्या सर्व निर्बंध शिथिल करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याने वारकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूर मध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. 


संबंधित बातम्या :


Ashadhi Wari : आषाढी वारीची घोषणा; ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या पालखीचं 'या' तारखेला पंढरीकडे प्रस्थान


Ashadhi Wari: 'जीव हाये तोवर, नाथांचा रथ सजवणारच' गेल्या 25 वर्षांपासून सजवतात रथ अन् करतात सारथ्य


Ashadhi Wari : वारी मार्गावर दिंडीदरम्यान वाहनांची एकेरी वाहतूक सुरू राहणार, वारकऱ्यांच्या मागणीला यश