शिर्डी : 40 वर्षापासून पायात घुंगरू व ढोलकीच्या तालावर ताल धरणाऱ्या लोक कलावंतांच्या पदरी निराशा आली असून पोटासाठी तमाशा कलावंताला हातात झाडू घेऊन सफाईचे काम करण्याची वेळ आली आहे. अगोदर कोरोना आणि नंतर सरकारी आश्वासन पूर्ण न झाल्याने तमाशा महिला कलावंत छबुबाई चव्हाण गेल्या वर्षभरापासून सफाईच्या कामातून उदरनिर्वाह करत आहेत.
महाराष्ट्रात आज लहान आणि मोठे मिळून 130 तमाशा फड असून 4500 हून अधिक कलावंत यात सहभागी आहेत. मात्र कोरोनामुळे अनेक लहान फडांचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेक तमाशा कलावंतांच्या पदरी मिळेल ती नोकरी करण्याची वेळ आली आहे. छबुबाई चव्हाण संगमनेर तालुक्यातील समनापूर या गावातील तमाशा कलावंत व लहान फड मालक आहेत. गेली 40 वर्ष 35 कलाकारांना घेऊन त्यांनी आपला फड चालवला आणि कोरोना आल्यानंतर आर्थिक संकटामुळे फड बंद करून आज त्यांच्यावर हातात झाडू घेऊन सफाई करण्याची वेळ आली आहे.
सासऱ्यांचा असलेला फड नवऱ्याचा निधनानंतर स्वतः सांभाळत गेली 40 वर्ष छबुबाई यांनी 35 कलाकारांना घेऊन तमाशा व्यवसाय सुरू ठेवला. मात्र अचानक कोरोनाचे संकट आले आणि लहान फड असल्यानं कलाकारांना देण्यास पैसे उरले नाही आणि छबुबाई चव्हाण यांना आज पोटासाठी चारचाकी वाहनाच्या शोरूम मध्ये सफाई कामावर जाण्याची वेळ आली आहे.
आम्ही सरकारकडे अनेक दिवसापासून मागणी करतोय मात्र मदतीच आश्वासन आज ही पूर्ण झालं नाही. राज्यातील अनेक लहान फडातील कलावंत बेरोजगार झाले असून अनेकांनी मिळेल ते काम करण्याचा पर्याय निवडला असल्याची माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणाऱ्या राज्यात लोककलावंत आजही उपेक्षित असून वेळीच मदत न मिळाल्याने अनेक कलावंत अडचणींचा सामना करत आहेत. आगामी काळात ही सरकारचे असेच दुर्लक्ष राहिल तर अनेक लहान तमाशा फड शोधून सापडणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. तमाशा हा मुख्यत्वेकरुन गावागावातील जत्रा, यात्रांवर चालतो. मात्र, कोरोनामुळे यावर निर्बंध आल्याने तमाशा पूर्णपणे बंद होते