= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विठुरायाच्या पूजेवेळी शिंदे घराण्याच्या चार पिढ्या उपस्थित पंढरपूर : आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2022) निमित्ताने विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नातवाला कडेवर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली विठ्ठल रुक्मिणीची पूजा आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. यावेळी नातवाला कडेवर घेत त्यांनी विठुरायाची पूजा केली आहे. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा आज आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2022) निमित्ताने महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा पार पडली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आषाढी एकादशी निमित्ताने वडाळा येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी! आज आषाढी एकादशी निमित्ताने मुंबईच्या वडाळा इथल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटे 3 वाजल्पायासून विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सुरू करण्यात आले आहे. रात्रीपासून भाविक मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. मंदिरात भजन कीर्तन मोठ्या जल्लोषात सुरू आहे. तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर कोरोनाच्या संकंटानंतर पहिल्यांदा वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात (प्रति पंढरपूर) मोठ्या जल्लोषात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जात आहे. या वेळी भाविकांच्या मनामध्ये मोठा उत्साह आहे. याच मंदिरात पहाटे 4 वाजता पहिल्या आरतीसाठी मुंबईच्या माजी महापौर किशोरी ताई पेडणेकर देखील उपस्थित होत्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pandharpur : पंढरपूर मध्ये भक्तांचा महापूर Pandharpur : आळंदी आणि देहूवरून निघालेले लाखो वारकरी आता पंढरपूरमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. वारकरी आता चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूरपर्यंत पोहोचले आहेत आणि नामदेव पायरी बरोबरच ते आता आपल्या विठुरायाचे देखील दर्शन घेणार आहेत. पंढरपूर मध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले वारकरी अगोदर चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि नंतरच विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहतात वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून चंद्रभागेमध्ये दुथडी भरून स्वछ पाणी सोडण्यात आले आहे. वारकऱ्यांबरोबरच काही हुलडबाज तरुण देखील चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि यावेळी काही अवचित प्रकार घडू नये म्हणून एनडीआरएफची पथकं चंद्रभागेमध्ये तैनात करण्यात आली आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी 24 तास ही पथकं चांद्रभागेमध्ये गस्त घालत आहेत. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये कोणीही हुल्लडबाजी करू नये अस आव्हान एनडीआरएफच्या पथकाने केलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वाशीमच्या तरूणाने खडूमध्ये साकारले विठ्ठल-रखुमाईचे शिल्प मनात भक्ती असली आणि त्याला कलेचा आधार असला तर कोणत्याही गोष्टीत देव साकारता येतो. प्रत्येकाच्या अंगी एखादा नैसर्गीक कलागुण असतो. अनेकजण या गुणांना आपल्या रोजच्या जीवनात जपून त्याला नवा आकार देण्याचा प्रयत्न करतात. वाशीम शहरातील जिल्हा न्यायालयात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या हर्षल हिवसे या युवकाने आपल्या या कलेला जोपासून आषाढी एकादशीच्या पवित्र महिन्यात खडूमध्ये विठ्ठल-रखुमाईचे शिल्प साकारले आहे. कलावंत हर्षलने खडूमध्ये साकारलेल्या या शिल्पाचे कौतुक होत आहे.
वाशीम शहरातील गणेशपेठ भागात राहणार्या हर्षल हिवसे या कलावंताने लहानपणापासून जोपासलेल्या आपल्या कलेच्या माध्यमातून खडूमध्ये विठ्ठल-रखुमाईचे शिल्प रेखाटले आहे. हर्षलने खडूला विठ्ठल-रखुमाईचा आकार देवून मनमोहक शिल्प खडूमध्ये साकार केले आहे. हर्षलने आधीही मागील वर्षी खडुमध्ये अष्टविनायकाचे अप्रतीम शिल्प रेखाटले होते. खडूमध्ये रेखाटल्यानंतर रंगाच्या जादुगारीने हे शिल्प जिवंत वाटते.
याबाबत बोलताना हर्षल म्हणाला की, नेहमी रोजच्या घाईगडबडीतून आपल्याला आवडणारी कला टिकवून ठेवणे व त्यासाठी वेळ देणे फार कठीण असते. पण जिद्द, आवड असली तर हे सर्व सोपे जाते. खडूमध्ये विविध देव आणि महापुरुषाचे चित्र रेखाटणे ही कल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. मनापासून केलेल्या या प्रयत्नाला यश मिळाले. याआधी हर्षलने भगवान गौतम बुध्द, भगवान महावीर, गणपती आदींचेही चित्र खडुमध्ये रेखाटले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Shegaon News Update : शेगावच्या गजानन महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे. संत गजानन महाराज संस्थानने आषाढी एकादशी निमित्त सर्व तयारी पूर्ण केली असून यावर्षी कोरोनाच्या कुठल्याही निर्बंधाशिवाय आषाढी एकादशी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. उध्या जवळपास दोन लाख भाविक शेगावात दर्शनासाठी येतील असा विश्वास प्रशासनाला आहे. त्यामुळे शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंढरी दुमदुमली...चंद्रभागा स्नानासाठा भक्तांची मोठी गर्दी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वारकऱ्यांसोबत भजनात मग्न झाल्या खासदार नवनीत राणा, अमरावती वरून हजारो भाविक पंढरपूरला रवाना, भाविकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था वारकऱ्यांसोबत भजनात मग्न झाल्या खासदार नवनीत राणा, अमरावती वरून हजारो भाविक पंढरपूरला रवाना, भाविकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान कडून वारकऱ्यांना फराळचं वाटप.. एकादशी निमित्त अमरावती येथील नया अमरावती रेल्वे वरून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील हजारो भाविक वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी खासदार नवनीत राणा कडून भाविकांना मोफत फराळ देण्यात आले. पंढरपूरला जाणाऱ्या या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवत रेल्वे चालक आणि वाहकांचा सत्कार करत भाविकांना नवनीत राणा यांनी शुभेच्छा दिल्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Kalyan News : विठुरायाच्या दिंडीमध्ये चिमुकल्या वारकऱ्यांकडून पर्यावरण रक्षणाचा संदेश Kalyan News : आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात निघालेल्या दिंडीमध्ये चिमुकल्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या गजरासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलेला पाहायला मिळाला. आषाढी एकादशीचे औचित्य साधून कल्याणातील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे या बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय विद्या प्रबोधिनी शाळे तर्फे देखील दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. एकीकडे हातामध्ये टाळ मृदंगाच्या नादात विठू माऊलीचा गजर तर दुसरीकडे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारे फलकातून जनजागृतीही केली जात होती. कल्याण पश्चिमेच्या टिळक चौकातून निघालेली ही दिंडी माता अहिल्यादेवी होळकर चौक, शंकरराव चौक करत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. ज्यामध्ये 1 ली ते 4थ्या इयत्तेतील तब्बल 500 चिमुकले वारकरी सहभागी झाले होते. तर विठ्ठल रुक्मिणी, संत नामदेव, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी या दिंडीची शोभा अधिकच वाढवली. तर यंदा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसोबत संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अकोल्यातील अकोट येथील कलाकारांनी रांगोळीतून वारी आणि विठ्ठल साकारला पंढरीच्या आषाढी वारीच्या पुर्वसंध्येला अकोल्यातील अकोट येथील कलाकारांनी रांगोळीतून वारी आणि विठ्ठल साकारलाय. अकोटमधील चतुर्भूज आर्टचे संचालक, चित्रकार अनिल काळे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ही 10 बाय 10 फुटांची रांगोळी साकारली. ही रांगोळी साकारायला तब्बल तीन दिवस लागले. तर सुमारे 15 किलो रांगोळी यासाठी लागली. अकोटकरांनी रांगोळीतून साकारलेलं हे विठ्ठल अन् वारीचं अनोखं रूप पाहण्यासाठी गर्दी करायला सुरूवात केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वैष्णवांचा मेळा स्नेहालयात स्नेहालय संचलित इंग्रजी माध्यम शाळेत मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवले जात असतात. आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला व्हावी यासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठोबा रायास वंदन करून शाळेतील चिमुकल्यांनी बालदिंडीचे आयोजन केले. टाळांचा निनाद, विठू नामाचा गजर, गवळणी, भजनांची मैफल, लेझीमचा जल्लोष या सर्वामुळे जणू अवघे गरजे पंढरपुरच स्नेहालयात अवतरल्यासारखे वाटत होते.
ज्योती चव्हाण यांनी पंढरपूरच्या वारीचे महत्त्व सांगितले व शबाना शेख यांनी ईदच्या सणाबद्दल माहिती सांगून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा हडप, भक्ती शुक्रे, जयश्री खरात यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची आरती करण्यात आली आणि मुलांना खाऊ वाटप केले. या कार्यक्रमाचे आयोजन क्षितिजा हडप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी केले. उपस्थित सर्व पालक, शिक्षक, स्नेहालयातील इतर कर्मचारी यांनी आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चिमुकल्यांकडून शाळेत छोटे वारकरी बनून आषाढी उत्साहात साजरी श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटी ट्रस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल डेरवमध्ये आज चिमुकल्यांनी आषाढी एकादशी साजरी केली. वारकरी पेहराव करुन हातात टाळ आणि डोक्यावर तुळस, गळ्यात तुळशीच्या माळी घालून छोटे वारकरी आज शाळेत गेले होते.उद्या रविवार सुट्टी असल्याने आजच शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आषाढी एकादशी निमित्ताने वांद्रे तेथे लता दिदींनी गायलेल्या अभंगाची मैफल आषाढी एकादशी निमित्त वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे "चरण कमल तुझे" हा भक्तिमय संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून लतादीदींनी गायलेल्या अभंगांची ही मैफिल या निमित्ताने रंगणार आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार दरवर्षी वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय गाण्याचा कार्यक्रम आयोजित करुन हा सण उत्साहात वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करतात. यावर्षी भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाची मैफिल रंगणार आहे. निरूपणकार संजय उपाध्ये यांचे निरूपण आणि त्यासोबत अद्वैता लोणकर, सोनाली कर्णिक, आसावरी जोशी, अपूर्वा पेंढारकर यांच्या भक्तीमय स्वराचा साज या मैफिला चढणार आहे. रविवार दिनांक 10 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता रंगशारदा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जीवन गाणी तर्फे कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याच्या प्रवेशिका आमदार आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंढरपूरमध्ये भक्ती सागर लोटला कालपासून पंढरपूरमध्ये ही पावसाची रिपरिप सुरूच आहे. अशाही पावसात पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी पोहोचत आहे.. सगळ्या मानाच्या पालख्या या पंढरपूरच्या वेशीवर म्हणजे वाखरी मध्ये पोहोचल्या आहेत.. या पालखीसोबत चालणारे वारकरी महत्त्वाचा पंढरपूर मध्ये पोहोचल्यात पंढरपूर मध्ये आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करून नामदेव पायरीचे दर्शन घेतात. यातले बरेच वारकरी हे दर्शन रांगेत थांबून दर्शन घेतात मात्र दर्शन घेऊन जाणारे हे सगळे वारकरी आहेत त्यांनी अगदी पावसात सुद्धा मोठी गर्दी केलेली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नांदेड येथील उत्तरावर कुटुंबाकडून विठुरायाला 1 कोटी रुपयांचे दोन सुवर्ण मुकुट अर्पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंदिराला देणार नांदेड येथील उत्तरावर कुटुंबाकडून विठुरायाला 1 कोटी रुपयांचे दोन सुवर्ण मुकुट अर्पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंदिराला देणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चंद्रभागा स्नानासाठी लोटला हजारोंचा जनसागर आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जसे विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते तशीच ओढ चंद्रभागेच्या स्नानाची असते. सध्या लाखो भाविक पंढरीत दाखल झाले असताना चंद्रभागा वाळवंटावर देखील भाविकांचा अथांग जनसागर लोटला आहे. चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी असली तरी आषाढी यात्रेला उजनी धरणातून सोडलेले पाणी पात्रात पोहोचल्याने पाणी पातळी देखील जास्त आहे. यातच चंद्रभागेच्या पात्रात वाळू माफियांनी वाळू उपसा करून मोठ मोठे खड्डे केल्याचा फटका भाविकांना बसत आहे. यामुळेच प्रशासनाने पात्रामध्ये आपत्कालीन व्यवस्थेच्या बोटी नदीपात्रात फिरवणे सुरु ठेवले असून या टीमने आत्तापर्यंत जवळपास 15 बुडणाऱ्या भाविकांना वाचविण्याचे काम केले आहे. भाविकांच्या चंद्रभागा स्नानाचा मोठा उत्साह दिसत असून अबालवृयुद्ध चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात स्नानाचा आनंद घेत आहेत. चंद्रभागेचे सर्व घाट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असून चंद्रभागा तीरावर भाविकांचा महापूर आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपार पर्यंत जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून वाटून दिलेल्या प्लॉटवर त्यांनी आपले तंबू उभारले आहेत. या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे शुद्ध पाणी, आरोग्य व्यवस्था, स्वच्छतागृहे, वीज, डांबरी रस्ते आणि सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच या ठिकाणी पाच लाखांपेक्षा जास्त भाविकांना येथे निवासाची सोय झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून काल नवमीपर्यंत शहरात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचं पंढरपुरात आगमन होणार आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचं पंढरपुरात आगमन होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्यानं वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल
Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. पंढरपूरच्या जवळ येताच वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपुराकडे ओढली जाऊ लागतात. आज पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचं पंढरपुरात आगमन होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्यानं वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.