Ashadhi Ekadashi 2024 : आज आषाढी वारीचा (Ashadhi Wari) सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूरची (Pandharpur) नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा (Shri Vitthal Rukmini Mahapuja) संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु या युक्तीप्रमाणे वारकऱ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे. कारण आज आषाढी वारीचा सोहळा साजरा होत आहे. दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्याची अतुरतेने वाट पाहत असतात. आज चंद्रभागेच्या तिरावर वारकऱ्यांचा सोहळा भरला आहे. वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन आहेत.
बळीराजा सुखी होऊ दे, राज्यातील जनता आनंदी होऊ दे
मी विठ्ठलाकडे नेहमी जनतेसाठी बळीराजासाठी मागणं मागत असतो. बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी होई दे हे मागण बळीराजाकडे मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज सळीकडे भक्तीमय वातावरण झालं आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं विठ्ठलाला मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस
हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिसऱ्या वर्षी मला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापुजा करण्याचं भाग्य लाभल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आपण सर्वजन वारकऱ्यांची भगवी पताका फडकत ठेवत आहात, त्याबद्दल आपले सर्वाचं आभार असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
Varkari Pesion Scheme : मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, कोणाला मिळणार लाभ? काय असतील तरतूदी?