तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्या लोकांनाच थारा द्या, असं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेत केलं.
“देशाला आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा मोदींच्या विचारांची नाही, तर आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे. गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आंबेडकरी जनता आणि मुस्लिमांचा विसर पडला आहे.”, असा आरोप ओवेसी यांनी केला.
VIDEO : असदुद्दीन ओवेसी यांचं संपूर्ण भाषण
VIDEO : प्रकाश आंबेडकर यांचं संपूर्ण भाषण
भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम युती आणि राज्याचं राजकारण
निवडणुकीला उणेपुरे 5-6 महिने राहिलेत. त्याआधी भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दी ओवेसी एकत्र झालेत. त्यामुळे अर्थातच काँग्रेस राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आलाय. तर भाजपची निम्मी अडचण दूर झालीय.
औरंगाबादच्या जबिंदा लॉनवरचा दलित-मुस्लिम ऐक्याचा एल्गार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारं चित्र आहे.
मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मुस्लिम आणि अनुसुचित जाती-जमातींचा मोठा समुदाय आहे. त्यामुळे ही मतं आंबेडकरांसोबत गेली, तर धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी नक्की वाढेल. निवडणुकीच्या राजकारणात जात फॅक्टर महत्वाचा आहे. त्यामुळे समुदायानुसार जर ताकदीचा अंदाज घेतला तर, मुस्लिम समाज 8 टक्के, बौद्ध 6 टक्के, इतर दलित 6 टक्के, आदिवासींची संख्या 8 टक्के इतकी आहे. त्यामुळे या 28 टक्के व्होटबँकेत आंबेडकर-ओवेसी मोठे भागीदार असतील.
दलित-मुस्लिम ऐक्याचा हा पहिला प्रयोग नाहीय. याआधी 30 वर्षांपूर्वी कुख्यात हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडेंनी हातमिळवणी केली होती. त्यांनी दलित मुस्लिम मुक्ती सेना स्थापन केली होती. पण संघटनात्मक बांधणी नसणं, किमान समान कार्यक्रम नसणं आणि लोकांचा पाठिंबा नसल्यानं ती फेल ठरली. 30 वर्षानंतर आता पुन्हा आंबेडकर आणि ओवेसी एकत्र येत आहेत. प्रयोग सेम आहे. पण दोघांची ताकद जास्त आहे.
महाराष्ट्र विधानसभेत एमआयएमचे दोन आमदार आहेत. औरंगाबाद पालिकेत एमआयएमचे 24 नगरसेवक आहेत. भारिप बहुजनचे बळीराम शिरसकर विधानसभेत आहेत. कधीकाळी सत्ता असलेल्या अकोला पालिकेत भारिप बहुजनचे 3 सदस्य आहेत. भारिप-बहुजनचा अकोला, वाशिम, बुलढाण्यात प्रभाव आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ओवेसींना प्रतिसाद मिळतो.
त्यामुळे भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम युतीचा राज्याच्या राजकारणावर किती फरक पडतो, हे येणार काळच ठरवेल.