एक्स्प्लोर

खासदार सुभाष भामरेंची कामगिरी समाधानकारक, भाजपच्या गुप्त सर्व्हेतून माहिती

दिल्लीतील ‘चाणक्य’ संस्थेच्या माध्यमातून भाजपने केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रातील भाजपच्या 6 खासदार आणि 50 आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचे समोर आलं होतं.

मुंबई : भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये आपली कामगिरी समाधानकारक असल्याचा दावा धुळ्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केला आहे. भामरे यांच्या मतदारसंघात केलेल्या सर्व्हेमध्ये 37 टक्के नागरिकांनी भामरे यांच्या कामगिरीवर 'संतुष्ट' असल्याचं मत नोंदवलं आहे.

दिल्लीतील ‘चाणक्य’ संस्थेच्या माध्यमातून भाजपने केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रातील भाजपच्या 6 खासदार आणि 50 आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचे समोर आलं होतं.

खासदार सुभाष भामरे यांची कामगिरीबाबत जनता समाधानी

सुभाष भामरे यांच्या कामगिरीवर त्यांच्या मतदार संघातील 37 टक्के लोक 'संतुष्ट' असल्याची माहिती भाजपच्या गुप्त सर्व्हेतून समोर अाली आहे. 12 टक्के लोकांनी भामरे यांची कामगिरी 'ठिकठाक' असल्याचं म्हटलं आहे. तर 12 टक्के लोकांनी ‘माहीत नाही’ असं उत्तर दिले.

धुळे ग्रामिण, धुळे शहर, सिंदखेडा, मालेगाव आणि बागलाण याठिकाणी हा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व्हेमध्ये सुभाष भामरे नापास नसून पास असल्याचं समोर आलं आहे.

भाजपकडून गुप्त सर्व्हे

दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ आणि एकंदरीत सरकारी धोरणांमुळे टीकेचं धनी बनलेलं केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारकडून जनमताची चाचपणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील भाजप सरकारने गुपचूप सर्व्हे करुन घेतल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून केलेल्या सर्वेत, भाजपचे राज्यातील 6 खासदार आणि जवळपास 50 आमदार धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ या दैनिकाने याबाबतचं वृत्त छापलं आहे.

महाराष्ट्रात केलेल्या या सर्वेनुसार भाजपच्या 121 आमदारांपैकी 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.

नुकत्याच झालेल्या या सर्वेत, मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील आमदार-खासदारांना रेटिंग/गुण देण्यास सांगितलं होतं. आमदार-खासदाराची कामगिरी समाधानकारक आहे की नाही?, आमदार-खासदारपदाचा उमेदवार बदलावा की कायम ठेवावा? असे प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले होते.

40 टक्के आमदारांची कामगिरी निराशाजनक

भाजपच्या एका आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वेत 40 टक्के आमदारांची चार वर्षातील कामगिरी अत्यंत वाईट असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जर उर्वरीत कार्यकाळात कामगिरी सुधारली नाही तर 2019 मध्ये त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल, असा इशारा देण्यात आल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

जवळपास 60 टक्के मतदारांनी विद्यमान आमदार-खासदारांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे.

दुसरीकडे ज्या खासदारांना केवळ 19 टक्क्यांपर्यंत पसंती मिळाली आहे, त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. सध्याच्या भाजपच्या 21 खासदारांपैकी 6 खासदांचं तिकीट 2019 मध्ये कापण्याची चिन्हं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही. संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही. संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2026 | बुधवार
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget