एक्स्प्लोर

सोलापुरात टायर, लाकडं जाळून कृत्रिम पावसाचा प्रयोग, पर्यावरणप्रेमींचा विरोध

लाकूड आणि टायर जाळून धूर काढून कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. याला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे.

मुंबई : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्चून विमानातून धूर काढला, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता पाऊस पाडण्यासाठी प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. लाकूड आणि टायर जाळून धूर काढून कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. याला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. टायर आणि लाकूड जाळून हा प्रयोग केला जाणार असल्याने यामुळे प्रचंड प्रमामात हवा प्रदूषण होणार आहे. पण हा शास्त्रीय प्रयोग असल्याचा दावा प्रशासनाने केलाय. पर्यावरणप्रेमी मयुरेश प्रभुणे यांनी सोशल मीडियावरुन या प्रयोगावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. “नैसर्गिकरीत्या पाऊस पडणे अपेक्षित असताना कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यासाठी 1024 गावांमधून एकाचवेळी हजारो क्विंटल लाकूड आणि टायर जाळून वातावरणात प्रचंड धूर सोडण्याचा उद्योग (22 सप्टेंबर) सोलापूर जिल्हा प्रशासन करणार आहे. विज्ञानाच्या नावाने चालणार् या वरूणयंत्र या बोगस तंत्रज्ञानाला शासनाचे व्यासपीठ उपलब्ध होतेच कसे हा मोठा प्रश्न आहे. पावसाच्या नावाने हजारो झाडांची शासनातर्फे होणारी कत्तल थांबवण्यासाठी मुंबई आणि सोलापूरमध्ये कोणी पर्यावरणप्रेमी आहेत का? विज्ञानाच्या नावाने शेतकर्यांच्या भावनांशी खेळणार्या बोगस तज्ज्ञांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे का?” असा सवाल मयुरेश प्रभुणे यांनी केला आहे. सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचं आश्वासन दिलं होतं. अनेक प्रयत्न करुनही याला यश आलं नाही. त्यानंतर आता भीषण हवा प्रदूषण करणारा हा प्रयोग होत आहे. त्यामुळे बुद्धीचा दुष्काळ पडलाय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, आयएएस अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा प्रयोग होतोय. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Deshpande: 'हट्ट करू नका, 'इनोव्हा' मिळेल!' गाड्यांच्या मागणीवरून मनसेनं पालिका सत्ताधाऱ्यांना पाठवलं गिफ्ट; संदीप देशपांडेंनी 'इनोव्हा' केल्या कुरिअर
'हट्ट करू नका, 'इनोव्हा' मिळेल!' गाड्यांच्या मागणीवरून मनसेनं पालिका सत्ताधाऱ्यांना पाठवलं गिफ्ट; संदीप देशपांडेंनी 'इनोव्हा' केल्या कुरिअर
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : पॅलेट गनचं रेकॉर्ड सुरक्षित ठेवा, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, SOP बाबत उत्तर मागितलं,दिल्ली सरकारला जखमींवर उपचाराचे आदेश
पॅलेट गनचं रेकॉर्ड सुरक्षित ठेवा, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, SOP बाबत उत्तर मागितलं
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Crime News: भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...
भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
Karj Mafi : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार 
कर्जमाफीची 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी,आधार प्रमाणीकरण करावं लागणार
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Embed widget