एक्स्प्लोर

राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर, सरकारच्या दफ्तर दिरंगाईचा बळीराजाला फटका

त्यानंतर डीजीसीएच्या तपासणीला आणखी वेळ लागणार आहे. प्रत्यक्षात 8 ते 9 ऑगस्टला विमानांचे उड्डाण होणार आहे. यामुळे मंत्र्यांनी घोषित केलेला 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टला जाण्याची शक्यता आहे.

सोलापूर : राज्यातला कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर गेला आहे. सरकारच्या दफ्तर दिरंगाईचा फटका बळीराजाला बसणार आहे. आता 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार आहे. कर्नाटकचे कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यापुर्वीच सुरू झाले आहेत मात्र महाराष्ट्रातील मंत्र्यांनी दिलेला मुहूर्त चुकणार आहे. कर्नाटकचे विमान आले असून महाराष्ट्रातील विमान 2 किंवा 3 तारखेला पोहोचणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक विवेकानंद बालापल्ली यांनी दिली आहे. त्यानंतर डीजीसीएच्या तपासणीला आणखी वेळ लागणार आहे. प्रत्यक्षात 8 ते 9 ऑगस्टला विमानांचे उड्डाण होणार आहे. यामुळे मंत्र्यांनी घोषित केलेला 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टला जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात विमानाची टेंडर देणे अपेक्षित होते.  कर्नाटक सरकारने फेब्रुवारीमध्ये टेंडर दिल्याने महाराष्ट्रापेक्षा आधी कर्नाटकमध्ये प्रयोग सुरु झाला आहे. औरंगाबादमधील रडारच्या दोनशे किलोमीटर परिक्षेत्रातच हा प्रयोग होणार आहे, असा खुलासा कृत्रिम पावसासाठी कंत्राट मिळालेल्या कंपनीने केला आहे. यामुळे राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पूर्ण विदर्भात होणार नाही तसेच मराठवाड्यातील देखील काहीच भागात हा प्रयोग होणार आहे, अशी माहिती आहे. यामुळे महाराष्ट्रातील बळीराजाला कृत्रिम पावसासाठी आणखी पाहावी लागणार आहे. मागील आठवड्यात सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणते ढग योग्य आहेत. त्या ढगांवर रासायनिक घटकांची फवारणी कधी करावी याचा अभ्यास सुरू केला आहे. सुमारे 100 कोटी रुपये बजेट असलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. या प्रकल्पासाठी परदेशातून आलेली विविध उपकरण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या आवारात बसवण्यात आली आहेत. वैज्ञानिक पर्जन्य छायेतीस ढगांचा अभ्यास करत आहेत. सी बॅण्ड रडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रडारमधून पर्जन्य छायेतील ढगांवर आडव्या आणि उभ्या लहरी सोडल्या जातात. या लहरी ढगांना भेदून जी माहिती देतात त्यावर आधारित कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू होतील. दुष्काळी पट्ट्यातील ढगांचा, वातावरणाचा 24 वैज्ञानिकांची टीम अभ्यास करत आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी ढगांवर सोडियम क्लोराईड किंवा कॅल्शियम क्लोराइड असे घटक फवारले जातात. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये असलेल्या या उपकरणांच्या सहाय्याने किमान दोनशे वेळा फवारणीचे प्रयोग करुन त्याचे निष्कर्ष मांडले जाणार आहेत. सोलापूर विमानतळावर दोन विमानं यासाठी तैनात करण्यात आली आहेत. प्राथमिक अभ्यासामध्ये पर्जन्य छायेतील ढगांमध्ये पाऊस पडण्याएवढी क्षमता असल्याचं दिसून आलं आहे. परंतु अभ्यासाचे पूर्ण निष्कर्ष हाती यायला वेळ लागेल. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा उपयोग करून कृत्रिम पावसासाठी पर्जन्यछायेच्या प्रदेशाची आलेली माहिती देशभरासाठी उपयोगी असणार आहे. पडलेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी करमाळा, तुळजापूर, उस्मानाबाद, अक्कलकोट ते कर्नाटकातील इंडीपर्यंत 120 पर्जन्य मापक यंत्र बसवलेली आहेत. सोलापूरचा 65 किलोमीटर परिघात हे प्रयोग केले जात आहेत. हवा मोजण्यासाठी चार टॉवर याठिकाणी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Mira Bhayander Municipal Corporation Priyanka Rajput: पत्रिकेत कुणाचं नाव वर, कुणाचं खाली?; नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईकांच्या वादात अतिरिक्त आयुक्त अडकल्या, थेट उचलबांगडी
पत्रिकेत कुणाचं नाव वर, कुणाचं खाली?; नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईकांच्या वादात अतिरिक्त आयुक्त अडकल्या, थेट उचलबांगडी

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Embed widget