एक्स्प्लोर

बाण माकडाच्या छातीत घुसला, अखेरचा प्रयत्न अयशस्वी ठरला!

राधानगरी तालुक्यात घडलं जे घडलं त्यानं अंगावर काटा उभा राहिला. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील वानराच्या कळपात कुणीतरी धारदार बाण मारला. तो बाण थेट एका वानराच्या छातीत आरपार घुसला.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका हा निसर्गाच्या संपदेनं नटलेला आहे. निसर्गाची विविध रुप या तालुक्यात पाहायला मिळतात. मात्र राधानगरी तालुक्यात घडलं त्यानं अंगावर काटा उभा राहिला. झालं असं की काल राधानगरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील वानराच्या कळपात कुणीतरी धारदार बाण मारला. तो बाण थेट एका वानराच्या छातीत आरपार घुसला. रक्ताळलेलं वानर छातीत घुसलेला बाण तसाच घेऊन जीव वाजवण्यासाठी या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत होतं. स्थानिकांनी अनेक प्रयत्न केले पण वानर कुणाला सापडलं नाही.

बायसन नेचर ग्रुपच्या सम्राट केरकर यांनी वन विभागाशी संपर्क साधला. अनेक प्रयत्न केले पण हे वानर काय सापडतं नव्हते. .इतका धारदार बाण या वानराला कुणी मारला? का मारला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण त्या वानराची अवस्था पाहून अनेकांना गहिवरुन आलं. स्थानिक वन विभागाला देखील ते वानर सापडत नव्हतं. जखमी झालेल्या वानराची जगण्यासाठी धडपड त्याच्या पद्धतीनं सुरु होती. पण त्याची जखम खोल होती. त्याच्यावर उपचार होणे गरजेचं होतं. पण काही केल्या वानर सापडेना.

कोल्हापुरातून शेवटी वन विभागाची रेस्क्यू टीम बोलवण्य़ात आली. रात्री उशिरा या वानराला पकडण्यात आलं. पण अजून पूर्ण यश आलं नव्हतं. प्राथमिक उपचार सुरु केले. छातीत आरपार घुसलेला बाण काढला. उपचारासाठी कोल्हापूरला आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण त्याच वेळी घायाळ झालेल्या त्या वानराने आपला प्राण सोडला. साधारण चार ते पाच तास केलेले प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. आणि उपस्थितांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. वन विभागानं आता बाण मारणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.

राधानगरी तालुक्यातील निसर्गाच अद्भुत रुप जगासमोर आणण्यासाठी बायसन नेचर क्लब नेहमी प्रयत्न करत असतो. पण या घटनेनं सगळ्यांना खूप दु:ख झालं आहे. एकीकडे राधानगरी तालुका पर्यटनासाठी चांगला पर्याय असता ही घटना मनाला चटका लावणारी आहे. ज्यांनी वानरावर हल्ला केला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असं बायसन नेचर क्लब, राधानगरीचे सम्राट केरकर यांनी म्हटलं आहे.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget