एक्स्प्लोर
नराधमाच्या अटकेसाठी आंदोलकांनी मुंबई-आग्रा हायवे रोखला!
नराधमाला अटक करावी आणि संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलकांच्या आहेत.
धुळे : पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यासाठी तेली समाज आक्रमक झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर तेली समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.
8 फेब्रुवारी रोजी पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमीष दाखवलं आणि शाळेच्या आवारात नराधामाने बलात्कार केला. धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे ही घटना घडली.
नराधमाला अटक करावी आणि संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलकांच्या आहेत.
धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील सुरत बायपास सर्कलजवळ तेली समाजाने रास्ता रोको केला. अर्धातास झालेल्या या रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement