एक्स्प्लोर

अर्णब गोस्वामींचा मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं अर्ज, अन्वय नाईक प्रकरणातील आरोपपत्राला विरोध

रिपब्लिक वृत्त वाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे.

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राला रिपब्लिक वृत्त वाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. त्यावर पुढील आठवड्यात तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात शुक्रवारी आपलं आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार यात रिपब्लिक वृत्त वाहीनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींसह कंत्राटदार फिरोझ शेख आणि नितेश सारडा या दोन आरोपींविरोधात याप्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आरोप लावण्यात आले आहेत. या 1914 पानी आरोपपत्रात रायगड पोलीसांकडून एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार खटला वर्ग होताना आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवले जाईल. त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून ज्यासाठी अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून या प्रकरणात रायगड पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राची तूर्तास दखल न घेण्याचे निर्देश अलिबाग सत्र न्यायालयाला जारी करण्यात यावेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत याप्रकरणाची चौकशी तसेच पोलिसांच्या पुढील तपासप्रक्रियेवरही तुर्तास बंदी आणावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सदर याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान अलिबाग न्यायालयात याच प्रकरणातील अन्य दोन आरोपी फिरोझ शेख आणि नितेश सारडा यांनीही आपले जामीन अर्ज शनिवारी मागे घेतले. अर्णब गोस्वामी यांनी यापूर्वीच आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे. तसेच रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेलाही विरोध दर्शवला. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात 10 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्यानं तूर्तास इथं सुनावणी घेऊ नये अशी विनंती आरोपींच्यावतीनं कोर्टाकडे करण्यात आली. त्यानुसार अलिबाग सत्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी 19 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

साल 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या आईने अलिबागमधील राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नाईक यांनी गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. नाईक यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी फेरतपासाची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य केल्याने रायगड पोलिसांनी 4 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांना मुंबईतून अटकही केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं गोस्वामी यांची सुटका करण्याचे निर्देश दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Amit Thackeray : चंद्रकांत पाटलांच्या खात्याकडून विद्यार्थिनींना 2000 रुपयांच्या पॉकेटमनी देण्याच्या हालचाली, अमित ठाकरे संतापले, म्हणाले...
चंद्रकांत पाटलांच्या खात्याकडून विद्यार्थिनींना 2000 रुपयांच्या पॉकेटमनी देण्याच्या हालचाली, अमित ठाकरे संतापले, म्हणाले...
Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दार किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दार किती?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget