APMC Election Result Live Updates  : अहमदनगर: जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी 9 जागेवर विजय

APMC Election 2023 : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राहिलेल्या काही ठिकाणचे निकाल जाहीर होणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 May 2023 02:29 PM
Nashik APMC Election : मनमाड बाजार समितीमध्ये आ.सुहास कांदे यांना मोठा धक्का, भुजबळ गटाची एकहाती सत्ता 

Nashik APMC Election : मनमाड बाजार समितीसमध्ये भुजबळ गटाने एकहाती सत्ता मिळवली असून सुहास कांदे गटाचा पराभव करण्यात आला आहे. बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 14 जागेवर भुजबळ गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर सुहास कांदे यांच्या गटाला अवघी 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. व्यापारी गटातून व्यापारी विकास पॅनलला 2 जागा तर हमाल मापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. 

- मनमाड बाजार समितीत आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का, 11 पैकी 7 जागेवर महाविकास आघाडी विजयी

- मनमाड बाजार समितीत आ.सुहास कांदे यांना मोठा धक्का..
- सोसायटी गटातून शिवसेना ( उध्दव ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख गणेश धात्रक विजयी..डॉ.संजय सांगळे यांचा केला पराभव...
- महाविकास आघाडीचे माजी आमदार संजय पवार सोसायटी गटातून विजयी..
- महिला राखीव जागेवरही संगीता कराड व चंद्रकला पाटील विजयी..
- सोसायटी गटातही महाविकास आघाडीची सरशी..
- ११ पैकी ७ जागेवर महाविकास आघाडी विजयी...
- महाविकास आघाडी - ७  शिंदे गट - १ , व्यापारी विकास - २ तर अपक्ष - १

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 पैकी 18 जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा विजय 

APMC Election:  पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकालाचे आकडे स्पष्ट 


18 पैकी 18 जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा विजय 


रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा मोठा विजय 


महाविकास आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही

 मनमाड बाजार समितीच्या सात जागांचे निकाल जाहीर..जागेवर महाविकास आघाडीची बाजी

 मनमाड बाजार समितीच्या सात जागांचे निकाल जाहीर.


APMC Election:  नाशिकच्या अत्यंत चुरशीच्या मनमाड बाजार समिती निवडणुकीत 7 जागांचे निकाल जाहीर झाले असून  ग्रामपंचायत गटातील 3 जागेवर महाविकास आघाडीने बाजी मारत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या गटाला 4 पैकी केवळ 1 जागा मिळाली. आतापर्यंत 7 जागांचे निकाल जाहीर झाले असून महाविकास आघाडी 3 शिंदे गट 1  व्यापारी विकास 2 व अपक्ष 1 असे बलाबल आहे..

प्रतिष्ठेच्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांची सत्ता, 18 पैकी 12 जागांवर विजय

परभणी जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आणि प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती ती पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीची. मागच्या 30 वर्षापासून पाथरीवर राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांनी सर्व ताकत पणाला लावली होती. मात्र असा असताना कालआलेल्या निकालांती राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी 18 पैकी 12 जागा जिंकत पुन्हा एकदा या बाजार समितीवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान बाजार समिती विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या स्थानिक नेत्यांवर घनाघाती टीका केलीय.शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष चोरला त्यांच्या वडिलांचे नाव चोरलं 15 मे च्या आत यांचा फैसला होणार आहे. शिंदे यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारलाय आणि तोच पैसा खाली त्यांच्या चोर कार्यकर्त्यांना देऊन ते निवडणूक लढवत असल्याचा गंभीर आरोप  बाबाजानी दुर्राणी यांनी केलाय.

मनमाड बाजार समिती निवडणुकीचा पहिला निकाल हाती, अपक्ष उमेदवार मधुकर उगले विजयी

APMC Election:  मनमाड बाजार समिती निवडणूक निकाल हाती. हमाल-मापारी गटातील पहिला निकाल जाहीर. हमाल - मापारी गटातील अपक्ष उमेदवार मधुकर उगले विजयी..
- सुनील काकड यांचा 16 मतांनी केला पराभव. 

यवतमाळच्या आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचं वर्चस्व

Yavatmal : यवतमाळच्या आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे. काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 18 पैकी 11 जागेवर विजयी मिळवला.
यात शिवसेना ठाकरे गटाने 5 जागा जिंकल्या आहे.

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेचा पेच, दोन्ही आघाडीला 18 पैकी नऊ-नऊ जागा  

APMC Election: आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेचा पेच आहे. कारण दोन्ही आघाडीला 18 पैकी नऊ-नऊ अशा जागा  मिळाल्या आहेत. 

वाशीमच्या रिसोड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिंदे गटाचा झेंडा, 18 पैकी 10 जागेवर विजय

Washim APMC Election:  वाशीमच्या रिसोड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. 18 पैकी 10 जागेवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील 6 बाजार समित्यांपैकी केवळ 1 बाजार समितीमध्ये भाजप-शिंदे गटाला यश मिळालं आहे. 

APMC Election: आमदार बांगर यांना धक्का; महाविकास आघाडीला बारा जागा तर शिंदे आणि भाजप गटाला फक्त पाच जागा

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे पॅनल तर विरोधात महाविकास आघाडीचे पॅनल होते. या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून या मतमोजणी मध्ये महाविकास आघाडीने संतोष बांगर यांना धोबीपछाड दिला आहे.  बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरीमध्ये महाविकास आघाडीने १२ जागावर निवडून येत संतोष बांगर यांना धक्का दिला आहे तर बांगर यांना फक्त ५ जागावर समाधान मानावे लागत आहे. 

अहमदनगर: जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी 9 जागेवर विजय

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीला 9 जागेवर तर भाजपला 9 जागेवर विजय...
कर्जतच्या निकालाची जामखेडमध्ये पुनरावृत्ती...
मतदारांकडून भाजप - राष्ट्रवादीला समसमान कौल...
आ.राम शिंदे आ.रोहित पवार यांना मतदारांकडून सारखीच पसंती...

APMC Election: राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांना धक्का; अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती भाजप शिंदे काँग्रेस च्या एकत्रित पॅनल च्या ताब्यात

जालना जिल्ह्यातील 5 कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी  3 बाजार समित्यांवर भाजप शिवसेना (शिंदे )महायुती ला विजय मिळलाय ,माजी आरोग्यमंत्री राष्ट्रवादी चे नेते राजेश टोपे यांच्या मतदार संघातील 35 वर्ष राष्ट्रवादीच्या ताब्यातील अंबड बाजार समिती भाजप शिंदे गटाच्या ताब्यात गेलीय,यामुळे राजेश टोपे यांना धक्का बसलाय, दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघातील घनसावंगी बाजार समिती त्यांना आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश आलंय, या ठिकाणी महाविकास आघाडी ला 18 पैकी 18 जागा मिळाल्यात, तर जिल्ह्यातील मंठा बाजार समिती वर महाविकास आघाडी ने वर्चस्व मिळवून भाजपच्या ताब्यातून ही  बाजार समिती हिसकावली.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता

Nanded APMC Election : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आली आहे. 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या असून, एक जागा अपक्षाला मिळाली आहे. काँग्रेस - 12, राष्ट्रवादी - 3, ठाकरे गट 2 जागा भाजप शिंदे गटाचा सुपडा साफ झाला आहे. 

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 9 जागांवर काँग्रेस विजयी...

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 9 जागांवर काँग्रेस विजयी...


काँग्रेस आमदार कुणाला पाटील यांच्या पॅनेल ची विजयी आघाडी...


भाजप पॅनेलचा धुव्वा...

रिमझिम पावसात लाखांदूरात बाजार समितीचे उत्साहात मतदान सुरू

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू झालेले आहे. भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाची हजेरी सुरू असतानाही आज सकाळपासून मतदारही पावसाची तमा न बाळगता मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत. लाखनी इथं काल झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव करत भाजपनं मुसंडी मारत विजय मिळवला आहे. त्यामुळं नाना पटोले यांच्या हातातून एक बाजार समिती गेल्यानं आता लाखांदूरची बाजार समिती टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघातील लाखांदूर येथे मोठ्या उत्साहात मतदान होत असून त्याचा आढावा घेतला.

धरणगाव बाजार समितीत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलने खाते उघडले

 


APMC Election : धरणगाव बाजार समितीत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलने खाते उघडले आहे. धरणगाव बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाच्या सहकार सहकार पॅनलचा हमाल मापारी मतदार संघातील एक उमेदवार विजयी.

राहाता बाजार समितीची निवडणुकीत विखे विरुद्ध थोरात असाच सामना

APMC Election :  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीची निवडणूक प्रकिया आज पार पडत आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची निर्विवाद सत्ता असलेल्या बाजार समितीत यावेळी बाळासाहेब थोरातांनी आव्हान दिले असून, आजी माजी महसुलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. थोरातांनी काल संगमनेर बाजार समितीत सत्ता मिळवत आपला गड राखलाय. आज विखे पाटील आपला गड राखणार का? हे स्पष्ट होणार आहे. राहता बाजार समितीत यापूर्वीच तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीमध्ये पहिले कल महाविकास आघाडीच्या बाजूने

Dhule APMC Election :   धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीमध्ये पहिले कल महाविकास आघाडीच्या बाजूने... महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असे संकेत... या निवडणुकीत भाजप खासदार तथा माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी चुरस, भाजपचेच दोन पॅनल असल्यानं चुरस वाढली

APMC Election :  निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजपाच्या दोन पॅनल पडल्या कारणाने चुरस वाढली आहे.. आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आणि त्यांच्यामध्येच मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे.. यातील अडीचशे पेक्षा जास्त मतदारांना सोलापूर येथील सूर्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते अशी जोरदार चर्चा होती. त्याबाबतची व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या मतदारांना तेथे कुणी नेले आणि त्यांना ठेवलं कुठं असा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला होता. ते सर्व मतदार आज सकाळी निलंगा मध्ये मतदान केंद्राच्या बाजूलाच ट्रॅव्हल्स मध्ये येत दाखल झाले आहेत. यातील लोकांना बोलण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही माहिती देण्यास तयार नाहीत.

सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीसाठी आज मतदान

Satara APMC Election :  सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील 101 केंद्रांवर 27 हजार 362 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आठ टेबलांवर ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील आणि खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून प्रथमच या निवडणुकीत भाजपने देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत तर दुसरीकडे साक्री आणि शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती साठी आज मतदानाचे प्रक्रिया पार पाडत असून सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे... साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार मंजुळा गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते यांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे या ठिकाणी भाजपा विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळत असून शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अमरीश पटेल यांचे वर्चस्व कायम राहतं का हे देखील आज पाहणं महत्त्वाचं असणार आहे....

भंडाऱ्यांतील लाखांदूर आणि पवनी बाजार समितीसाठी मतदानाला सुरूवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Bhandara : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा मतदार संघातील लाखांदूर आणि शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विधानसभा मतदार संघातील पवनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आज होत आहे. लाखांदूर येथील पाच संचालकांची बिनविरोध निवड झालेली असून त्यात काँग्रेसचे तीन तर, भाजपच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. उर्वरित 13 जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीचा निकाल मतदान प्रक्रियेनंतर लगेच सुरू होईल. नाना पटोले यांच्या मतदार संघातील लाखनीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लाखांदूर बाजार समितीकडे लागल्या आहे. रिपरिप पावसाच्या हजेरीत मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत नाना पटोले, प्रफुल्ल पटेल, भाजपाचे परीणय फुके, शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील 3 बाजार समितींच्या मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

APMC Election : चंद्रपूर जिल्ह्यातील 3 बाजार समितींच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पोंभुर्णा, गोंडपिंपरी आणि भद्रावती बाजार समितीसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली असून, मतदारांमध्ये देखील उत्साह, आज 54 संचालकांच्या निवडीसाठी होत आहे मतदान, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर आणि काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

परभणीतील पाथरी, सोनपेठ आणि पालम बाजार समितीत मतदान सुरु, चार वाजेपर्यंत होणार फैसला 

APMC Election : परभणी जिल्ह्यातील दहापैकी सात बाजार समित्यांचा निकाल काल लागला मात्र आज अत्यंत प्रतिष्ठेच्या पाथरी सोनपेठ आणि पालम या तीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे.  यानंतर लगेच मतमोजणी प्रक्रिया ही केली जाणार आहे आज सकाळी आठ पासूनच सर्वत्र शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे परभणीच्या पाथरीत मागच्या पंचवीस वर्षापासून बाजार समितीवर सत्ता असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासमोर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मोठे आव्हान उभे केले आहे तर तिकडे सोनपेठ मध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यासमोर राष्ट्रवादीच्याच एका गटान इतर सर्वपक्षीयांनी सोबत घेऊन आव्हान उभे केले आहे त्यामुळे या दोन्हीही लढतींकडं जिल्ह्याचे लक्ष लागलेलं आहे.

जालना जिल्ह्यातील 5 कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज फैसला, तर तीन समित्यांमध्ये आज मतदान

APMC Election :  जालना जिल्ह्यातील 5 कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज फैसला होणार असून आज अंबड, मंठा आष्टी या तीन बाजार समित्यांसाठी मतदान होत आहे, काल झालेल्या घनसावंगी,परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान झाले, आज या सर्व समित्यांची सायंकाळी 5 वाजल्या पासून एकत्रित मतमोजणी होणार आहे. माजी आरोग्यमंत्री राष्ट्रवादी नेते राजेश टोपे, भाजप आमदार बबनराव लोणीकर ,आमदार नारायण कुचे यांची प्रतिष्ठा या बाजार समितीच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. 

 अमरावती जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी मतदान, बच्चू कडूंची प्रतिष्ठा पणाला 

APMC Election : आज अमरावती जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्याच्या सहा बाजार समितीची निवडणूक होत आहे. यात धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, वरुड, दर्यापूर,अचलपूर आणि धारणीचा समावेश आहे. मात्र सर्वांचे लक्ष आहे ते चांदुर बाजार आणि अचलपूर बाजार समितीकडे. याठिकाणी आमदार बच्चू कडू यांनी स्वतःच पॅनल उभं केलं आहे. तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचं पॅनल उभं आहे. तर दुसरीकडे वरुडमध्ये भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर धामणगाव रेल्वे येथे भाजप आमदार प्रताप अडसड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नागपूरमधील मौदा बाजार समितीसाठी आज मतदान, 18 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज मतदान होणार आहे. मौदा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आला असून, आता 35 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट हे तिन्ही पक्ष एकत्र झाल्याने ही निवडणूक आक्रमक होणार आहे. तर काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमधील ठाकरे गटातील नेते व कार्यकर्ते यांनी हातमिळवणी  केली आहे.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान, 18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात

APMC Election : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होत आहे. 787 मतदार आहेत. 18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे..मनमाड - येवला रोडवरील ' संत झेवियर हायस्कूल ' मध्ये मुख्य मतदान केंद्र असून या ठिकाणी सोसायटी गट, ग्रामपंचायत गट, व्यापारी गट आणि हमाल मापारी गट अशा चार गटांसाठी चार स्वतंत्र मतदान कक्ष उभारण्यात आले आहे..सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.. शिवसेना ( शिंदे गट ) विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरुद्ध तालुक्यातील पाच माजी आमदार, महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे.


 


 

पार्श्वभूमी

APMC Election 2023 Result Live Updates : सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Agricultural Produce Market Committee) रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी मतदान प्रक्रिया होऊन निकालही जाहीर झाले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल अद्याप बाकी आहेत. आजही काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पारपडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय मिळवला आहे.


दरम्यान, या बाजार समित्यांच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. तर बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी गटालाही धक्का बसल्याचे चित्र आहे. 
राहिलेल्या ठिकाणी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे. 


बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे, नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भूसे, मंत्री विजयकुमार गावीत, एकनाथ खडसे या सारख्या नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. या नेत्यांच्या पॅनेलचा पराभ झाला आहे. काही ठिकाणी सत्तेसाठी निर्माण झालेल्या अभद्र युत्यांना सुद्धा मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील निकालामध्ये संमिश्र यश उमटलं आहे. विदर्भातील रामटेक, नागपूरमधील सुनिल केदार, आशिष जायस्वाल यांच्या अभद्र युतीला त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या पॅनलने केलेला पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीने बाजी मारली. नगरमध्ये विखे पाटील गटाला बाळासाहेब थोरातांनी धक्का देत भोपळाही फोडू दिला नाही. 


कुठे काय झालं? 


मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या ' आपलं पॅनल ' ला धक्का देत शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब पॅनल विजयी.
भंडारा : नाना पटोलेंच्या जिल्ह्यात काँग्रेसला जेमतेम यश
नंदुरबार : मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या भावाचा पराभव..
बारामती : सर्वच्या सर्व 12 जागांवर राष्ट्रवादीचा कब्जा करताना सत्ता राखली आहे. 
दौंड : संजय राऊतांच्या आरोपांनंतरही दौड बाजारसमितीत आमदार राहुल कुल यांचा दणदणीत विजय झाला आहे. 
भुसावळ जळगाव : बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भुसावळमध्ये धक्का बसला आहे. भुसावळमध्ये 18 पैकी 15 जागांवर भाजप सेनेचा विजय झाला आहे. 
दिग्रस, यवतमाळ : अन्न व औषधी प्रशासनमंत्री संजय राठोड यांना धक्का बसला आहे, तर नेरमधे माजी मंत्री माणिकराव ठाकरेंना धक्का  बसला. 
इस्लामपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला. 
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचा धुवा, 18 पैकी 17 जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपले वर्चस्व ठेवले कायम बाजार समिती निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित पॅनलला खातेही उघडता आले नाही. 
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या भगवा फडकला. 18 पैकी 17 जागांवर एक हाती शिवसेनेचे सत्ता तर एका जागेवर अपक्ष उमेदवार यांचे वर्णी लागली. भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या भावाचा पराभव.
मालेगाव : मंत्री भुसेंना धक्का, बाजार समिती अद्वय हिरेंकडे, 11 पैकी 10 जागांवर ' कर्मवीर भाऊसाहेब हिरे ' पॅनल विजयी.
संगमनेर : बाजार समितीवर बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व सिद्ध, 18 पैकी 18 जागा जिंकून महाविकास आघाडीचा विजय. भाजपचे विखे पाटील गटाचे खातेही उघडले नाही. सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवला विजय. 
परळी : धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना धोबीपछाड. कृषी उत्पन्न बाजार समिती 18 पैकी 11 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय. सेवा सहकारी सोसायटी विभागातील 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस नि जिंकल्या भाजपाला अद्याप एकही जागा जिंकता आली नाही. 
अमरावती : बाजार समितीत आमदार यशोमती ठाकूर यांनी झेंडा फडकवला, आमदार रवी राणा यांना मोठा धक्का रवी राणा यांचे मोठे बंधू सुनिल राणा यांचा ही बाजार समिती निवडणुकीत पराभव. रवी राणा यांच्या पॅनलमधून एकही उमेदवार विजयी झाला नाही.
जळगाव : जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या भाजपचे शेतकरी सहकारी पॅनलचा सर्व 18 जागांवर एकहाती विजय. 
नांदेड  : भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आघाडीची  सत्ता कायम. 18 पैकी 15 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी विजयी. काँग्रेस 13 तर 2 जागांवर राष्ट्रवादी विजयी. अशोक चव्हाण यांचा गड शाबूत. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का बसला आहे. भाजप-शिंदे गटाला धक्का. भाजपाला केवळ ३ जागा, तर पहिल्यांदा निवडणुक लढवबाऱ्या बीआरएसला भोपळा हाती आला आहे. 
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 18 पैकी 15 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपनं 3 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मात्र या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.