APMC Election 2023 Result Live Updates : मालेगाव बाजार समितीत मंत्री दादा भुसेंना धक्का, अद्वय हिरे यांच्या पॅनेलचा विजय

APMC Election 2023 Result Live Updates : 95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी होणार आहे. तर काही ठिकाणी आज मतदान होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Apr 2023 04:07 PM
Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली

Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरातील तीन मजली इमारत कोसळली आहे. वर्धमान असे या इमारतीचे नाव असून 50 ते 60 जण डिगारे खाली दाबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली आहे. 

Nashik APMC Election :  डिजेला बंदी फक्त नावालाच, राष्ट्रवादी आमदाराची डिजेच्या तालावर विजयी मिरवणूक

Nashik APMC Election :  पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार दिलीप बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी अकरा जागांवर विजय मिळवला. अशातच डिजे साउंड सिस्टीमवर गाणे लावत मिरवणूक काढण्यास बंदी असतांना देखिल बाजार समितीच्या आवारात डिजेचा दणदणाट करत ट्रॅक्टरवर विजयी मिरवणूक काढण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडताच बनकर यांच्या समर्थकांकडून गुलाल उधळत, डिजेच्या तालावर नाचत जल्लोष साजरा करण्यात आला. पोलीस आता यावर काही कारवाई करणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

जामनेर बाजार समितीमध्ये भाजप शिंदे गटाचे पॅनल आघाडीवर

APMC Election :  जामनेर बाजार समितीमध्ये भाजप शिंदे गटाचे पॅनल आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 18 पैकी 12 जागांवर भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्या शेतकरी सहकार पॅनल ने विजय मिळवला आहे.  गड राखण्यात मंत्री गिरिश महाजन हे यशस्वी ठरले असून महविकास आघाडीच्या पॅनल चां याठिकाणी पराभव झाला आहे. 

मावळमध्ये आमदार सुनील शेळकेंचा बाळा भेगडेंना झटका, मविआचे 17 सदस्य विजयी

Pune : पुण्याच्या मावळमध्ये महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवत, भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला धक्का दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना पुन्हा एकदा झटका दिलाय. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर मविआचे सतरा तर भाजप-शिंदे गटाचा एका सदस्याची वर्णी लागली आहे. मविआच्या सतरा सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा तर काँग्रेसच्या दोघांचा समावेश आहे. या विजयानंतर मविआने मोठा जल्लोष केला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आणि बाजार समितीला नवसंजीवनी देण्याचा विश्वास मविआने व्यक्त केलाय.

Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीत चुंभळे गटाने खातं उघडलं; प्रल्हाद काकड विजयी

Nashik APMC Election : नाशिक बाजार समिती निवडणुकीत शिवाजी चुंभळे गटाने खाते उघडले असून शेतकरी विकास पॅनलचे प्रल्हाद काकड विजयी झाले आहेत. आपलं पॅनलचे विश्वास आप्पा नागरे यांचा पराभव केला असून काकड हे शंभर हुन अधिक मतांनी विजयी झाले आहेत. 

संगमनेर बाजार समितीवर थोरात यांचे वर्चस्व, विखे पाटील गटाचे खातेही उघडले नाही

APMC Election : संगमनेर बाजार समितीवर थोरात यांचे वर्चस्व सिद्ध...
18 पैकी 18 जागा जिंकून महाविकास आघाडीचा विजय..
भाजपचे विखे पाटील गटाचे खातेही उघडले नाही..
सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवला विजय..
प्रतीष्ठेच्या लढतीत थोरातांची सरशी...
संगमनेरातील जनता थोरातांच्या पाठिशी...
संगमनेर बाजार समितीवर थोरातांनी फडकवला झेंडा...
संगमनेरात थोरातांच्या कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष...

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीनं गड राखला, विजय शिवतारेंना धक्का

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा अठरा जागांवर विजय झाला आहे. विजय शिवतारे यांना मोठा धक्का मिळाला आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसनेच्या सर्व जागांवर पराभव झाला असून महविकास आघाडीने आपला गड राखला आहे. पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्यातील 22 गावांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीवर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची एक हाती सत्ता मागील काळात होती. यावेळेस सुद्धा आपली सत्ता राखण्यास त्यांना यश आले या निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे 18 जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत

यवतमाळच्या नेर बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोडांचे वर्चस्व; माजी मंत्री माणिकराव ठाकरेंसह संजय देशमुखांना धक्का

Yavatmal : यवतमाळच्या नेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात पालकमंत्री संजय राठोड यांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले, तर माजी मंत्री माणिकराव ठाकरे व संजय देशमुख यांना धक्का सहन करावा लागला.  एकूण 18 जागापैकी उध्दव ठाकरे आणि काँग्रेस आघाडी 8 आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी युतीला 10 जागा मिळाल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीने राजकिय वातावरण चांगलेच तापले होते. प्रचारादरम्यान आरोप- प्रत्यारोपाचा धुरळा उडाला.  निकाल जाहीर होताच पालकमंत्री राठोड समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

 चांदवड बाजार समितीत सत्ता परिवर्तन, माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या पॅनेलचा विजय

 APMC Election : चांदवड बाजार समितीत सत्ता परिवर्तन...
- माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलने मारली बाजी..
- 18 पैकी 10  जागेवर मिळविला विजय... 
- भाजपचे आ.राहुल आहेर यांच्या शेतकरी विकास पॅनलला मिळाल्या सात जागा...
- अपक्ष १ जागेवर विजयी...

पारोळा बाजार समितीत शिंदे गटाच्या आमदार चिमणराव पाटलांना धक्का, महाविकास आघाडीची 15 जागांवर मुसंडी ...

APMC Election : पारोळा बाजार समितीमध्ये  महाविकास आघाडीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मार्केट कमिटी बचाव पॅनल ने  18 पैकी पंधरा जागांवर विजय नोंदवत पारोळा बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना पराभवाची धूळ चारत मोठा धक्का दिला आहे.या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या जयकिसान पॅनल ला केवळ तीन जागांवरच विजय मिळवता आला आहे

अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला 18 पैकी 18 जागेवर विजय

अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला 18 पैकी 18 जागेवर विजय मिळाला आहे. 2 जागा बिनविरोध झाल्या होत्या तर 16 जागेवर आजच्या निकालात भाजपला विजय  मिळाला. 

बहुचर्चित पिंपळगाव बसवंत बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व, आमदार दिलीप बनकर यांचा विजय 

 APMC Election : बहुचर्चित पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणूक 


- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शेतकरी विकास पॅनलचे नेते आमदार दिलीप बनकर यांचा विजय 


 - एकूण 11 जागांवर बनकरांच्या शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व 


- ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांना धक्का, कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलचा 6 जागांवर विजय 


- मतमोजणी केंद्रावरील राड्यामुळं पिंपळगाव बाजार समिती निवडणूक आली होती चर्चेत

Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीत फेर मतमोजणीसाठी अर्ज; मतमोजणी पुन्हा सुरु

Nashik APMC Election : नाशिक बाजार समिती निवडणूक मतमोजणी दरम्यान एका विजयानंतर पुन्हा फेर मतमोजणी करण्यात येत आहे. नाशिक बाजार समिती निवडणुकीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून विनायक माळेकर यांना 995, जगन्नाथ कटाळे 956, तानाजी गायकर 895 तर प्रकाश भोये 678 मते मिळाली असून यात माळेकर यांनी 97 तर कटाळे यांनी 61 मतांनी विजय मिळविला आहे. मात्र, तानाजी गायकर यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केला असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतंत्र टेबल लावला असून त्यावर सध्या मतमोजणी सुरु आहे.

बीड बाजार समितीत पुतण्याचा काकाला धक्का, 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग

Beed APMC Election : बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी 5 पक्षांची मोट बांधून काका विरोधात दंड थोपटले होते. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांना धोबीपछाड केले. या विजयानंतर संदीप यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय. मागील 40 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती. ही निवडणुक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते. आता यावरूनच संदीप क्षीरसागर यांनी काकांना निवडणुकीमध्ये धोबीपछाड केले आहे. त्यामुळे क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.

गोंदियातील आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-राष्ट्रवादी चा झेंडा

 APMC Election : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्वांचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत भाजपच्या एका फुटीर गटाने काँग्रेस सोबत युती केली होती तर दुसरा गट हा राष्ट्रवादी सोबत होता. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर हे स्वतः या निवडणुकीमध्ये उभे होते. त्यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. या निवडणुकीचे निकाल हाती आले असून भाजप चे 8 उमेदवार तर राष्ट्रवादी कॉग्रेस चे 6 आणि  भारतीय कॉग्रेस चा 4 उमेदवार निवडून आले आहेत. असे एकूण 18 पैकी 18 निकाल हाती आले आहेत. यामध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

 मालेगाव बाजार समितीत परिवर्तन, मंत्री दादा भुसेंना धक्का देत अद्वय हिरे यांच्या पॅनेलचा विजय

Malegaon APMC Election :  मालेगाव बाजार समितीत परिवर्तन 
- अद्वय हिरे यांचा मंत्री दादा भुसे यांना बाजार समिती निवडणुकीत धक्का...
- सोसायटीच्या 11 जागेपैकी 10 जागेवर ' कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल '  ने मिळवला विजय...
- मंत्री भुसे यांच्या पॅनलला केवळ 1 जागा..
- ग्रामपंचायत गट, व्यापारी व हमाल मापारी गटाच्या 7 जागांचे निकाल अजून बाकी...
- हिरे समर्थकांमध्ये जल्लोष ; 50 खोके एकदम ओके च्या दिल्या घोषणा...

छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपा शिवसेना पुरस्कृत पॅनलला स्पष्ट बहुमत 15 पैकी 11 जागेवर विजयी

छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपा शिवसेना पुरस्कृत पॅनलला स्पष्ट बहुमत 15 पैकी 11 जागेवर विजयी
विजयी उमेदवार
1) राधाकिसन देवराव पठाडे
2) श्रीराम भाऊसाहेब शेळके
3) गणेश सांडू दहीहंडे 
4) भागचंद रुस्तुम ठोंबरे
5) अभिजीत भास्कर देशमुख
6) मुरलीधर पुंडलिक चौधरी
7) सुजाता मनोज गायके
8) जनाबाई ज्ञानेश्वर ठोंबरे
9) दत्ताभाऊ पांडुरंग ऊकर्डे 
10) भागिनाथ रणुबा नवपुते
11) पूनमचंद सोनाजी बमणे 


तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे 4 उमेदवार विजयी
1) जगन्नाथ वैजनाथ काळे
2) कैलास ज्ञानदेव ऊकर्डे
3) महेंद्र जनार्दन खोतकर
4) पठाण अब्दुल रहीम अब्दुल सलाम                 

Nashik APMC Election : मालेगाव बाजार समितीत दादा भुसेंना धक्का? अद्वय हिरे गटाची आगेकूच 

Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी मालेगाव बाजार समिती निवडणुकीत अद्वय हिरे गटाने सरशी घेतली आहे. त्यामुळे दादा भुसे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. मालेगाव बाजार समितीत सोसायटी गटाच्या 11 जागांची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून यात 11 पैकी 10 जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडी प्रणीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलला मिळत आहेत. सोसायटी गटातच हिरे यांनी निर्विवाद आघाडी घेतली आहे. युती असल्याने पालकमंत्री दादा भुसे यांना धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत. दरम्यान मागील 20 वर्षांपासून बाजार समितीवर पालकमंत्री भुसे यांच्या समर्थकांची सत्ता आहे. सोसायटी गटाचा कल लक्षात घेता अद्वय हिरे पालकमंत्री दादा भूसेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

Nashik APMC Election : येवला बाजार समितीत भुजबळ गटाची 15 जागांवर सरशी, दराडे गटाला केवळ 3 जागा 

Nashik APMC Election : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांचे वर्चस्व दिसून आले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 13 जागा मिळवीत दोन अपक्षांसह एकूण 15 जागांवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर आमदार दराडे गटाला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. येवला विधानसभा मतदारसंघात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली आहे.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

APMC Election : बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

सांगली बाजार समितीवर महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता

Sangli : सांगली बाजार समितीवर महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता


 18 पैकी 17  जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय, एका ठिकाणी अपक्ष विजयी


आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम,  आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पॅनेलला मिळाला विजय


भाजपचे मंत्री, पालकमंत्री सुरेश खाडे ,  खासदार संजय काका पाटील यांना पराभवाचा धक्का

राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर, भाजपा आणि काँग्रेस समर्थित शेतकरी परिवर्तन पॅनल विजयी

चंद्रपूर : राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर
18 पैकी भाजपा आणि काँग्रेस समर्थित शेतकरी परिवर्तन पॅनल - 15
शेतकरी संघटना समर्थित शेतकरी विकास पॅनल - 03


माजी आमदार आणि शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांना मोठा धक्का, 4 टर्म पासून बाजार समितीत असलेली सत्ता गमावली

बारामतीत कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची मुसंडी. 18 च्या 18 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

Baramati APMC Election : बारामतीत कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची मुसंडी. 18 च्या 18 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहणार, 17 उमेदवार आघाडीवर

APMC Election : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम आहे. राष्ट्रवादीचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. 

Nashik APMC Election : पिंपळगाव बाजार समिती निवडणूक मतमोजणी दरम्यान गोंधळ 

Nashik APMC Election : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत फेर मत मोजणीच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माजी आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक नितीन निकम यांच्यावर यतीन कदम धावून गेल्याने हमरीतुमरीवर गोष्ट आली. त्यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बंदोबस्तवरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Nashik APMC Election : पिंपळगाव बाजार समितीत दिलीप बनकर गटाचा विजय निश्चित, हे आहेत विजयी उमेदवार 

Nashik APMC Election : पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणुकीत दिलीप बनकर, अनिल कदम, गोकुल गिते, निवृत्ती शिरसाठ, दिपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, डॉ. प्रल्हाद डेर्ले, खालकर मनीषा, अमृता पवार, यतीन कदम, नंदु गांगुर्डे हे उमेदवार विजयी झाले आहेत. आर्थिक दुर्बल गटात राजेश पाटील, शरद काळे आणि राजेश पाटील विजयी.तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. यात हमाल मापारी गटातून शेतकरी विकास पॅनलचे रविंद्र दौलत पवार हे ७५ मते मिळवून विजयी झाले आहेत. तर व्यापारी गटातून लोकमान्य परीवर्तन पॅनलचे सचिन अग्रवाल हे १७० आणि शेतकरी विकास पॅनलचे सुशील पलोड १५८ मतांनी विजयी झाले आहेत. नाशिक बाजार समिती ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून विनायक माळेकर आणि जगन्नाथ कटाळे आघाडीवर आहेत.


 

नंदुरबार बाजार समितीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या पॅनलच्या पराभव, बंधू प्रकाश गावित हेही पराभूत

- नंदुरबार बाजार समितीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का. 


- डॉ. गावित यांचे बंधू प्रकाश गावित यांच्या बाजार समितीत पराभव....


- शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विक्रम वळवी यांनी प्रकाश गावित यांच्या पराभव केला..



- डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी प्रतिष्ठेचे मानले जाणारे नंदुरबार बाजार समितीत डॉक्टर गावित यांच्या पॅनलच्या पराभव....

Nashik APMC Election : येवला बाजार समितीत भुजबळ गटाचे खाते उघडले, शेतकरी विकास पॅनलचा पहिला विजय 

Nashik APMC Election : येवला बाजार समिती निवडणुकीतील पहिला निकाल हाती आला असून यानुसार भुजबळ गटाच्या शेतकरी विकास पॅनलच्या संध्या बापूराव पगारे विजयी झाले आहेत. अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून विजयी झाले असून त्यांना 425 मते मिळाली आहेत. तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ग्रामपंचायत गटात सर्वसाधारणमधून अपक्ष उमेदवार यतिन कदम विजयी झाले असून तर दिलीप बनकर गटातील शिरीष गडाख विजयी झाले आहेत. हमाल गटातून दिलीप बनकर गटाचे नारायण मामा पोटे विजयी, व्यापारी गटातून सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर विजयी झाले असून तीनही उमेदवार दिलीप बनकर गटाचे आहेत. 

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची आघाडी, 7 जागांवर विजय

Maval APMC Election : मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही निकाल हाती आले आहेत. यामध्ये महाविकासआघाडीने आगेकूच केली आहे. 18 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित झाला आहे. 

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे माजी आमदार गजानन घुगे विजयी 

APMC Election :  हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या पक्षांच्या वतीने पॅनल उभा करण्यात आला होता/ परंतु या पॅनलमध्ये भाजपचे माजी आमदार गजानन घुगे यांना स्थान नसल्याने त्यांनी स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली आहे गजानन घुगे यांनी स्वतःचे उमेदवारी व्यापारी मतदारसंघातून दाखल केल्यानंतर आजच्या मतमोजणी मध्ये त्यांचा विजय झाला आहे स्वतःच्याच भाजप आणि शिवसेनेच्या पक्षातील उमेदवारांना मागे टाकत गजानन घुगे यांनी विजयाची माळा गळ्यात घातली आहे माझ्या विरोधात सत्ताधारी दोन्ही आमदारांनी प्रचार केला तरीही निवडून आल्याची भावना माजी आमदार घुगे यांनी व्यक्त केली आहे.


 

Nashik APMC Election : चांदवड बाजार समितीत आठ जागांचे निकाल जाहीर, प्रहार जनशक्ती पक्षाने उघडले खाते...

Nashik APMC Election : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील आठ जागांचे निकाल हाती आले आहेत.  त्यानुसार सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे 631 मते मिळवून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत गटातील आर्थिक दुर्बल गटातून अपक्ष उमेदवार प्रहारचे उपजिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर विजयी झाले आहेत. सहकारी संस्था भटक्या जमाती प्रवर्गात लोकमान्य परीवर्तन पॅनलचे विक्रम मार्कंड हे 515 मते मिळवून विजयी झाले आहेत. सहकारी संस्था महिला राखीव गटात लोकमान्य परिवर्तन पॅनलच्या वैशाली जाधव व मिना शिरसाठ विजयी झाल्या असून ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात शेतकरी विकास पॅनल चे वाल्मिक वानखेडे विजयी झाले आहेत. लोकमान्य परिवर्तन पॅनलला पाच तर शेतकरी विकास पॅनलला दोन जागा मिळाल्या आहेत. 

भुसावळ बाजार समितीवर भाजप शिंदे गटाची एक हाती सत्ता, 18 पैकी 15 जागांवर विजय

APMC Election : भुसावळ बाजार समितीत आमदार संजय सावकारे यांच्या भाजप आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा 18 पैकी 15 जागांवर विजय झाला आहे. त्यांनी बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर विजय मिळवता झाला असून त्यांचा पराभव झाला आहे.  महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

चांदवड बाजार समितीत आठ जागांचे निकाल जाहीर, लोकमान्य परिवर्तन पॅनलला पाच तर शेतकरी विकास पॅनलला दोन जागा

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल ..
- चांदवड बाजार समितीत आठ जागांचे निकाल जाहीर
- लोकमान्य परिवर्तन पॅनलला पाच तर शेतकरी विकास पॅनलला दोन जागा...
- प्रहार जनशक्ती पक्षाने उघडले खाते...

अकोला बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता

Akola APMC Election :  अकोला बाजार समितीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता. सर्व 18 जागांवर एकतर्फी विजय. वंचित समर्थित पॅनलचा उडवला धुव्वा. अकोला बाजार समितीत सहकार आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचा सभापती होणार.  


अकोला बाजार समितीतील पक्षीय बलाबल :


एकूण जागा : 18 


भाजप : 05
राष्ट्रवादी : 09
काँग्रेस : 02
ठाकरे गट : 02


विजयी उमेदवार           पक्ष/आघाडी
विकास पागृत           ठाकरे गट
दिनकर वाघ              राष्ट्रवादी
वैभव माहोरे              भाजप
संजय गावंडे              भाजप
चंद्रशेखर खेडकर        राष्ट्रवादी
राजीव शर्मा                भाजप
शिरीष धोत्रे                 राष्ट्रवादी
दिनकर नागे                राष्ट्रवादी
राजेश बेले                  भाजप
भरत काळमेघ             भाजप
ज्ञानेश्वर महल्ले             काँग्रेस
अभिमन्यू वक्टे             काँग्रेस
सचिन वाकोडे              राष्ट्रवादी 
रामेश्वर वाघमारे            राष्ट्रवादी
शालिनी चतरकर           राष्ट्रवादी
माधुरी परनाटे                राष्ट्रवादी
मुकेश मुरूमकार            ठाकरे गट
हसन चौधरी                  राष्ट्रवादी

Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीमध्ये आपलं पॅनलने खात उघडलं, उमेदवार भास्कर गावित विजयी 

Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीसाठी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून निर्मला कड या 999 मतांनी विजयी झाल्या आहेत. सदानंद नवले यांचा पराभव झाला असून त्यांना एकूण 819 मते मिळाली आहेत. नाशिक बाजार समितीसाठी पिंगळे गटाच्या आपलं पॅनलचे उमेदवार भास्कर गावित हे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून विजयी झाले आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीसाठी ग्रामपंचायत गटातून अनुसूचित जातीमधून दिलीप बनकर गटाचे नंदू गांगुर्डे विजयी झाले आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील भूम बाजार समितीत 18 पैकी 11 जागेवर मंत्री तानाजी सावंत यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी 

Rain : धाराशिव जिल्ह्यातील भूम बाजार समिती


 18 पैकी 11 जागेवर मंत्री तानाजी सावंत यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी 


जिल्ह्यात आठ बाजार समिती ची होत आहे मतमोजणी

परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आघाडी..

परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आघाडी..


धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या संघर्षात धनंजय मुंडे समर्थकांची बाजी..


बीड जिल्ह्यातील केज..अंबाजोगाई..आणि गेवराई बाजार समिती च्या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी

पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा

Pune APMC Election : पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा
-भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता 
-काँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष एकत्र लढल्यानंतरही 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजयी
-काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंनी गड राखला
-निवडणूकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष एकत्र लढूनही काँग्रेसचं वरचढ


 


 

अहमदनगर जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी चुरस, कोण मारणार बाजी

Ahmednagar APMC Election : अहमदनगर जिल्ह्यात काल सात कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक पार पडली. त्यात अहमदनगर, राहुरी, संगमनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत बाजार समितीचा समावेश होता. त्यातील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल कालच लागला. तर उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार निलेश लंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार शिवाजीराव कर्डिले आणि खासदार सुजय विखे अशी लढत होणार आहे. पाथर्डीमध्ये आमदार मोनिका राजळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार रोहित पवार विरुद्ध आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगर जिल्ह्यात एकूणच सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली आहे. 

परळी मतमोजणी केंद्रावरील कर्मचाऱ्यावर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने घेतला आक्षेप
Beed APMC Election : परळी मतमोजणी केंद्रावरील कर्मचाऱ्यावर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आक्षेप घेतला आहे. उमेदवाराच्या ताब्यातील संस्थेत काम करणारा कर्मचारी प्रशासनानं मत मोजणीसाठी ठेवल्याचा आरोप करत आक्षेप. अखेर मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला हलवल्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरु झाली आहे.

 

 
पंढरपूर बाजार समितीत मतमोजणी सुरु, प्रशांत परिचारक गटाकडे 5 जागा बिनविरोध, 13 जागांसाठी उद्या मतमोजणी

Pandharpur : पंढरपूर बाजार समितीत मतमोजणी सुरु झाली आहे. विद्यमान सत्ताधारी प्रशांत परिचारक गटानं 5 जागा बिनविरोध जिंकल्या असून, उद्या 13 जागांवर मतमोजणी होत आहे. भाजपचे प्रशांत परिचारक यांना राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, कल्याण काळे आणि गणेश पाटील गटाने छुपा पाठिंबा दिल्याने निवडणूक एकतर्फी होत आहे. सत्ताधारी परिचारक यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आव्हान दिलं आहे. 
वार्षिक 480 कोटींची उलाढाल असणाऱ्या पंढरपूर बाजार समितीमध्ये डाळिंब आणि बेदाणा सौदे मोठ्या प्रमाणात होत असतात.

यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीची बाजी, भाजपा आणि शिंदे गटाला धक्का

PMC Election :  यवतमाळ जिल्ह्यातील 7 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीने या निवडणुकीत बाजी मारली, तर भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.


1) यवतमाळ बाजार समिती- कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या युतीला 11 जागा  तर भाजप आणि शिंदे गटला 4 जागा  तर 3 अपक्ष विजयी
-----
2) दिग्रस  उत्पन्न बाजार समिती -  महाविकास आघाडीला 14 तर  पालकमंत्री संजय राठोड यांच्या गटाला 4 जागा. उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा मोठा विजय 
------
3) बाभूळगाव बाजार समिती -  महाविकास आघाडीला 14 जागा तर भाजप-शिंदे गटाला 4 जागा.
-------
4) महागाव बाजार समिती-  भाजप आणि शिंदेगटाला 11 जागा तर कॉग्रेस 2 राष्ट्रवादी 5 अनेक वर्षांपासूनची नाईक परिवाराची राष्ट्रवादीची सत्ता भाजपने उलथवली भाजप शिंदेगट युतीकडे बाजार समिती.
------
5) वणी बाजार समिती-  भाजप-शिंदे गटाला 14 जागेवर यश. महाविकास आघाडीला 4 काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावर आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांना झटका. भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात बाजार समितीत मोठे यश.
-----


6) पुसद उत्पन्न बाजार समिती- महाविकास आघाडीकडे 18 पैकी 18 जागेवर विजयी मिळवण्यात यश. भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का 
-----
7) नेर बाजार समिती- उध्दव ठाकरे आणि काँग्रेस आघाडी 8 जागा
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी 10 जागा. पालकमंत्री संजय राठोड यांचा पॅनलचा निसटता विजय

मावळ आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात

Pune : पुण्याच्या मावळ आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता कोणाची हे आज स्पष्ट होणार आहे. मावळमध्ये मविआ विरुद्ध भाजप शिंदे तर मंचरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे विरुद्ध माजी खासदार शिवाजी आढळराव अशी लढत पाहायला मिळत आहे. मावळची मतमोजणी सुरु झाली आहे. तर मंचरची मतमोजणी साडेदहा वाजता सुरु होणार आहे.

Ahmednagar APMC Election : संगमनेर बाजार समितीचा कौल कोणाला? आजी - माजी महसूलमंत्र्यात प्रतिष्ठेची लढाई

Ahmednagar APMC Election : अहमदनगर जिल्ह्यातील प्रतीष्ठेची लढाई झालेल्या संगमनेर बाजार समितीचा आज निकाल लागणार आहे. माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर बाजार समितीत विखे पाटलांनी थोरातांना आव्हान दिलं आहे. या बाजार समितीत सत्तांतर होणार का? हे काही वेळात स्पष्ट होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 18 जागेपैकी विखे गटाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

भंडारा आणि लाखनी-साकोली बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील भंडारा आणि लाखनी-साकोली दोन बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात.


9 टेबलवर मतपत्रिकांची गठ्ठे बांधणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.


काही तासातच हा निकाल स्पष्ट होणार आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल , भाजपचे माजी मंत्री परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला.


त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष.

APMC Election : वाशीमच्या मानोरा बाजार समितीच्या मतमोजनीला सुरुवात

APMC Election : वाशीमच्या मानोरा बाजार समितीच्या मतमोजनीला सुरुवात झाली आहे. 5 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे

परभणी जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची आज निवडणूक

Parbhani : परभणी जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी काल मतदान झालं आहे. त्याची मतमोजणी आता सुरु झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा बोरी आणि ताडकळस या सात बाजार समित्यांच्या कारभाऱ्यांचा आज फैसला होणार आहे. सर्वत्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळपासूनच मतमोजणीच्या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

कुर्डुवाडी बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात होणार

APMC Election : कुर्डुवाडी बाजार समिती मध्ये राष्ट्रवादीचे आमदार बंधू बबनदादा शिंदे आणि संजयमामा यांची गेल्या 30 वर्षांपासून सत्ता आहे. यंदा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे . येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना , शेतकरी संघटना , मनसे , संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येत निवडणूक लावली आहे . या निवडणुकीत राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध विजयी झाली असून 17 जागांसाठी उद्या मतमोजणी होत आहे . या निवडणुकीत आमदार बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नुसते 5 कोटी सेस मिळवणाऱ्या या बाजार समितीमध्ये बोरे आणि डाळिंबाचे सौदे मोठ्या प्रमाणात होतात असा आरोप विरोधकांनी केला होता. 

कळवण बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, 18 पैकी 15 जागा शेतकरी विकास पॅनलला तर परिवर्तन पॅनलला केवळ 3 जागा..

Nashik APMC Election : नाशिकच्या कळवण बाजार समितीवर आमदार नितीन पवार , माजी सभापती धनंजय पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. कळवणमध्ये महाविकास आघाडी एकत्र येत सर्व समावेश पॅनलची निर्मिती केली होती. दरम्यान, माजी आमदार जे. पी. गावीत यांनी परिवर्तन पॅनलला जाहीर पाठींबा दिला होता. मात्र परिवर्तन पॅनलचे रविंद देवरे यांना केवळ 3 जागावर समाधान मानावे लागले आहे. बाजार समिती निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत एकच  जल्लोष केला.

नाना पटोले यांचे होम ग्राउंड असलेल्या लाखनी आणि भंडारा बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात होणार

Bhandara : भंडारा जिल्ह्यात चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे होम ग्राउंड असलेल्या लाखनी आणि भंडारा या दोन बाजार समितीचे मतदान काल पार पडले त्याची मतमोजणी आता काही वेळातच होत आहे. भंडारा जिल्ह्यातील चारही बाजार समितीत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हात मिळवणी केली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या भंडारा जिल्ह्यातील बाजार समितीच्या निकाल काही वेळातच स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघात असलेल्या लाखनी या बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्ह्यात लाखनी आणि भंडारा या दोन्ही बाजार समितीत सरासरी 98 टक्के मतदान झाले आता या निवडणुकीवर स्वबळावर लढणारी काँग्रेस सत्ता काबीज करेल का की भाजपची हात मिळवणी करणाऱ्या राष्ट्रवादीची सत्ता बसेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाना पटोले यांचे होम ग्राउंड असलेल्या लाखनी आणि भंडारा बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात होणार

Bhandara : भंडारा जिल्ह्यात चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे होम ग्राउंड असलेल्या लाखनी आणि भंडारा या दोन बाजार समितीचे मतदान काल पार पडले त्याची मतमोजणी आता काही वेळातच होत आहे. भंडारा जिल्ह्यातील चारही बाजार समितीत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हात मिळवणी केली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या भंडारा जिल्ह्यातील बाजार समितीच्या निकाल काही वेळातच स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघात असलेल्या लाखनी या बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्ह्यात लाखनी आणि भंडारा या दोन्ही बाजार समितीत सरासरी 98 टक्के मतदान झाले आता या निवडणुकीवर स्वबळावर लढणारी काँग्रेस सत्ता काबीज करेल का की भाजपची हात मिळवणी करणाऱ्या राष्ट्रवादीची सत्ता बसेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगली जिल्ह्यातल्या तीन बाजार समितीची आज मतमोजणी...

Sangli News : सांगली जिल्ह्यातल्या सांगली, इस्लामपूर आणि विटा  कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी आज होणार आहे..सांगली बाजार समितीसाठी 93. 45 टक्के तर इस्लामपूर बाजार समिती साठी 86. 57 टक्के आणि विटा बाजार समितीसाठी 91 : 30 टक्के इतके मतदान झाले आहे. तिन्ही बाजार समितीत चुरशीने मतदान झालेले आहे. यामुळे सर्वच पक्षातील गटाची धाकधूक वाढलीय.  सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा पॅनलमध्ये थेट लढत झालीय. तर इस्लामपूर बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस  विरोधात सर्व पक्षनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली तर विटा बाजार समितीत स्थानिक काँग्रेस,भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आणि या युती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्र पॅनल उभे केले होते. आता यामध्ये कुणाची सत्ता बाजार समितीत राहणार हे आज स्पष्ट होईल

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता कायम

Rahuri APMC Election : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता कायम आहे. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सत्ता कायम राखण्यात यश मिळाले आहे. 


 

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

Palghar : पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला. 17 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले.

Nashik APMC Election : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम

Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यातील कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे वर्चस्व कायम आहे. 

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम

Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यातील कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे वर्चस्व कायम आहे. 

पार्श्वभूमी

APMC Election 2023 Result Live Updates : ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यापैकी 95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी होणार आहे. तर काही ठिकाणी आज मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे. तर 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. 


नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता


नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांच्या  शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 17 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. देवळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सर्व समावेशक पॅनलची निर्मिती केली होती. यापूर्वी या पॅनलच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. आज झालेल्या 10 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवला. पॅनल विजयी होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी विकासासाठी पक्षीय जोडे बाजुला ठेवून पॅनलची निर्मिती केल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी सांगितलं.


मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडेंना धक्का


अमरावतीमध्ये मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांना धक्का बसला आहे. मोर्शी बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी तर भाजप, काँग्रेस (एक गट) 8 उमेदवार विजयी झाले आहे. हा अनिल बोंडे यांना धक्का मानला जातोय. 


लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसती एकहाती सत्ता


भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं आव्हान दिलं होतं. मात्र, भाजपमधील गटा-तटाचं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याचाच फटका भाजपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बसला आहे. 18 जागा एक हाती स्वतःकडे खेचत काँग्रेसने मोठा विजय मिळवला.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.