Nagpur Crime : हारिस रंगूनवालाविरोधात अपहरण, खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल
Nagpur Rangoonwala Crime : रंगूनवालाची पोलिसांमध्ये चांगलीच ऊठबस होती. तो व्यापाऱ्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. काही जणांना त्याने थेट 'डी गँग'ची भीती दाखविली होती.
Nagpur News : व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून लोखांची खंडणी उकळणाऱ्या हारिस आरिफ रंगूनवाला (वय 35 रा. जाफरनगर, नागपूर) याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी अपहरण आणि खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल केला. यापूर्वी पोलिसांनी (Nagpur Police) शस्त्राच्या धाकावर चार लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी दोन्ही भावंडांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
हारिसचे सदर भागात इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. सय्यद अजहर अली ताही अली (वय 61 रा. रामसुमेरबाबानगर, शांतीनगर) हे हारिसला ओळखतात. ऑगस्ट 2020 मध्ये हारिसने त्यांना छावनीत इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकानासाठी जागा मिळवून देण्याचे सांगितले. त्यांना जागा मिळवून दिली. त्याने सय्यद यांच्याकडून वेळोवेळी भाडेही घेतले. त्यानंतर हारिसने दुकानावर ताबा घेतला. हारिसने त्यांना पैशाची मागणी केली. त्यांनी नकार देताच हारिस हा सय्यद यांच्या घरी गेला. सय्यद यांच्या आठ वर्षीय मुलगा सय्यद युसूफ अली याचे अपहरण करून घेऊन गेला. दोन तासानंतर सय्यद यांनी साडेपाच लाख रुपये देऊन मुलाची सुटका केली. त्याने वेळोवेळी सय्यद यांच्याकडून एकूण 11 लाख 50 हजार रुपये उकळले. हारिसला अटक झाल्याचे कळल्यानंतर सय्यद यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी खंडणी, अपहरणासह गुन्हा दाखल केला. दोघेही सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत.
जिवाच्या भीतीने व्यापारी गप्प
रंगूनवालाची पोलिसांमध्ये चांगलीच ऊठबस होती. तो व्यापाऱ्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. काही जणांना त्याने थेट 'डी गँग'ची भीती दाखविली होती. त्यामुळे व्यापारी गप्प असून, मुलांना जीवे मारु अशी धमकीही त्याने दिली होती, असा दावा तक्रारदार सय्यद यांनी केला आहे.
एक वर्षापासून तक्रारीसाठी सदर पोलीस ठाण्याच्या चकरा
संबंधित व्यापाऱ्याने 2021 मध्येच सदर पोलीस ठाण्यात आपबिती सांगितली होती. मात्र पोलिसांनी रंगूनावालाविरोधात तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती. सय्यद यांनी अनेकदा सदर पोलीस ठाण्यात चकरा मारल्या. मात्र, तरीदेखील अधिकाऱ्यांनी रंगूनवालाविरोधात कारवाईसाठी पुढाकार घेतला नाही. अन्यायाविरोधात पोलीस तक्रारदेखील दाखल करत नसल्याचे पाहून भीतीने मनात आत्महत्येचा विचार आला होता, अशी भावना पीडित सय्यद यांनी व्यक्त केली आहे.
14 लाख रुपय असलेली बॅग घेऊन काढला होता पळ
दुकान रिकामे करण्याच्या बदल्यात हप्तावसुली करत 14 लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढणाऱ्यावर नागपूर पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात सहभागी असलेला हारिस आरिफ रंगुनवाला आणि त्याचा भाऊ झैनविरोधात पोलिसांनी (Nagpur Police) गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. या दोघांनीही एका रेस्टॉरंट चालकाची फसवणूक करत जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :