पुणे : किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहानानुसार आज 19 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशातील काही राज्यात आणि जगातील काही देशात अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणजे एक दिवसाचा उपवास करण्यात आला. 19 मार्च 18986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा हा 34 वा स्मृतीदिन होता. कोरोनामुळे अनेक किसानपुत्रांनी एकत्रित येणे टाळत वैयक्तिक स्वरुपात उपवास केला.
किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब यांनी सांगितले की, यंदा करोनाचे निमित्त करून सरकारने सामुदायिक उपोषणाला परवानगी दिली नाही.अनेक ठिकाणी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली, तरीही लोकांनी वैयक्तिक उपवास करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यंदाच्या उपवासात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ते पुढे म्हणाले की आजही दररोज 40 ते 50 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कोरोनापेक्षा भीषण परिस्थिती आहे. मात्र मारणारे शेतकरी असल्यामुळे सरकार आणि 'इंडियन; समाज त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
अमर हबीब यांनी 2017 साली पहिल्यांदा उपवास केला. नंतर हा उपवास दरवर्षी होऊ लागला आहे. सातत्याने अन्नत्याग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. समाजात जागृती व्हावी, सरकारवर प्रभाव पडावा व व्यक्तिगत स्तरावर शेतकऱ्यांप्रति आपली बांधिलकी बळकट व्हावी असे या अन्नत्याग आंदोलनाचे हेतू होते. त्यात आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे.
किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते अमर हबीब यांनी आज सकाळी फुलेवाड्यात जाऊन फुले दाम्पत्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व नंतर बालगंधर्व येथे येऊन त्यांनी दिवसभर उपवास केला. त्यांच्या सोबत किसानपुत्र आंदोलनाचे समन्वयक मयूर बागुल, नितीन राठोड, अॅड महेश गजेंद्रगडकर, अनंत देशपांडे, राजीव बसरगेकर, अस्लम सय्यद, संतोष मांढरे, सचिन गुरव, सलीम शेख, अमित सिंग आदी होते. सरकारने सामूहिक उपोषणाला बंदी केल्यामुळे अमर हबीब यांच्यासह कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत उपवास करावा लागला.
कोरोनाच्या सावटामध्ये महाराष्ट्रभर किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Mar 2020 09:43 PM (IST)
अमर हबीब यांनी 2017 साली पहिल्यांदा उपवास केला. नंतर हा उपवास दरवर्षी होऊ लागला आहे. सातत्याने अन्नत्याग करणार्याची संख्या वाढत आहे. समाजात जागृती व्हावी, सरकारवर प्रभाव पडावा व व्यक्तीगत स्तरावर शेतकऱ्यांप्रति आपली बांधीलकी बळकट व्हावी असे या अन्नत्याग आंदोलनाचे हेतू होते
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -