Anjali Damani on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय समजला जातो. आता याच वाल्मिक कराडसोबत व्यावसायिक संबंध असल्याचा पुरावाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणल्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आणला आहे. यामधील एका व्हिडिओ धनंजय मुंडे वाल्मिक कराडसोबत असून दुसऱ्या व्हिडिओत मुंडेंच्या हाती बंदूक आहे. यावरूनच दमानिया यांनी तोफ डागली आहे. 






कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते


दमानिया यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी यामधून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा. 






हे पोलिस आहेत का ह्या वाल्मिक कराडांचे नोकर? 


अन्य एका व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडच्या भोवती पोलिस पाहून संताप व्यक्त केला आहे. हे पोलिस आहेत का ह्या वाल्मिक कराडांचे नोकर?  एसपी नवनीत कवत यांनी ताबडतोब आदेश द्यावे की कोणत्याही पोलिस ऑफिसरने या पुढे जिहुजुरी करता कामा नये, असे ट्विट करत म्हटले आहे. 






गृहमंत्री देवेंद्र फडणीसांना आवाहन!


त्यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,महाराष्ट्रातील सगळ्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा. जिथे गरज नाही असे सगळे शास्त्र परवाने रद्द करा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे गुंडांचा नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या