Pune Crime News : बुधवारी पुण्यातील राजगुरूनगर  (Rajgurunagar) येथे घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळून आले होते. या मुलींची हत्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आचाऱ्याने केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. अजय दास (54) असे त्याचे नाव आहे. मुलींचा खुन करुन परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी राजगुरूनगरमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या  8 आणि 9 वर्षांच्या दोन बहि‍णींनी त्यांच्या घराच्या वर राहणाऱ्या आचाऱ्याने बोलावले. या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपलं बिंग फुटेल या भीतीने तिने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या आचाऱ्याने दुसरी बहिणीचा तसाच जीव घेतला. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले.


आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या


मुलींचे मृतदेह सापडल्यानंतर मुलींसोबत अत्याचार झाला आहे का? असा संशय व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपीला जेरबंद केले आहे. मुलींचा खुन करुन परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर मुलींच्या नातेवाईकांकडून ठिय्या आंदोलन केले जात आहे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी नातेवाईक करत आहेत. तर मुलींचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देखील नातेवाईकांनी दिलाय. पोलीस नातेवाईकांशी चर्चा करत असून नातेवाईक आंदोलनावर ठाम आहेत. 


पोलिसाचे चिमुकलीसोबत अश्लील चाळे


दरम्यान, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनल्याचे दिसून येत आहे. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


आणखी वाचा 


Satish Wagh Case : 48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या इंजिनिअरसोबत अफेअर, भाड्याच्या खोलीत अनैतिक संबंधांना अंकुर फुटला