Nagpur News नागपूर : शरद पवार (Sharad Pawar) यांनी यापूर्वीच एक वक्तव्य करून असे सांगितले होते की, सध्याचे जे महायुती, भाजपचे सरकार आहे ते एन निवडणुकीच्या तोंडावर केव्हाही दंगली घडवू शकतात. त्याचप्रमाणे राज्यात काल छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) , नाशिक (Nashik) व अन्य ठिकाणी ज्या काही घटना झाल्या, त्या कट कारस्थान करून दंगली घडवण्याचे प्रयत्न आहे का? हा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राज्यात अशा घटना घडू नयेत, राज्यात सलोखा आणि एकसंघ राष्ट्र रहावे, ही गृह खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या सगळं घटनांकडे सरकारने जातीने लक्ष दिलं पाहिजे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बोलताना व्यक्त करत सरकारवर निशाणा साधलाय. ते नागपूर येथे बोलत होते.
राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार- अनिल देशमुख
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सर्वेसर्वा शरद पवार हे आज विदर्भ आणि नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी आयोजित विविध कार्यक्रमांना शरद पवार हे भेट देणार आहेत. सोबतच वर्ध्यातील माजी आमदार सुरेश देशमुख यांची 75व्या वाढदिवसाच्या निमित्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तेथे देखील ते हजार राहणार आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आमच्याकडे येणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. कारण सर्वांना विश्वास आहे की राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार.
कालच आपण ऐकलं महाविकास आघाडीकडून कोण मुख्यमंत्री होणार याबाबत देखील एक मत झाले आहे. राज्यात मविआचे सरकार येऊन आमचाच मुख्यमंत्री बसेल हा विश्वास आम्हाला आहे. असे असताना राज्याचा मुख्यमंत्री कोण हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र बसून निर्णय घेतील. असेही अनिल देशमुख म्हणाले.
भाजप निवडणुकीला का घाबरतो?- अनिल देशमुख
निवडणूक आयोगाने काल विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. खऱ्या अर्थानं राज्यात देखील सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित होतं. मात्र, आम्हाला ही गोष्ट समजत नाही की भारतीय जनता पक्ष निवडणूक घेण्यासाठी का घाबरतो? निवडणुका जमेल तितक्या पुढे ढकलण्याचा प्रयत्न ते करत आहे. भाजप सरकार नगरसेवकांचे निवडणूक घेण्यासाठी तयार नाही. आपल्याला मोठा पराभव येईल, या भीतीने भाजप सरकार निवडणुकीसाठी घाबरत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या