Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तब्बेत खावावली आहे. यामुळं त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळं ताप आणि घसा खवखत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्लाही दिला आहे.
ताप आणि अशक्तपणा आल्यामुळं प्रकृती खालावली
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली असून, अंतरवाली सराटीत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मनोज जारंगे यांची तब्बेत बिघडल्याने सलाईन लावण्यात येत आहे. मनोज जारांगे यांना काल रात्रीपासून ताप आणि अशक्तपणा आला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अधिक तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने लॅबमध्ये पाठवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे देखील काही ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत. यासंदर्भात सातत्यानं त्यांच्या गाठी भेटी सुरु आहेत. विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार त्यांच्या गाठी भेटी घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळं रात्री उशीरापर्यंत त्यांच्या बैठका सुरु आहेत. तसेच सातत्यानं उपोषण केल्यामुळं त्यांची प्रकृतीवर परिणाम होत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीची गरज आहे. कारण त्याना खूप अशक्तपणा आला आहे. त्यामुळं आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मनोज जरांगेंनी दंड थोपटले! विधानसभेसाठी तीन कलमी कार्यक्रम; निवडणुकीचा नेमका प्लॅन काय?