Angarki Chaturthi 2022 LIVE : गणपती बाप्पा मोरया! निर्बंधमुक्तीनंतर पहिलाच अंगारकीचा योग, गणेशभक्तांमध्ये उत्साह

Angarki Sankashti Chaturthi 2022 LIVE : निर्बंधमुक्तीनंतर पहिलाच अंगारकीचा योग, राज्यभरात गणेशभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Apr 2022 03:24 PM
Raigad News Update : पेण येथील गणेशमूर्ती निघाल्या परदेशी, बँकॉक, थायलंड आणि अमेरिकेतून मागणी  

Raigad News Update :  रायगड जिल्ह्यातील गणपतीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेण शहरातून सुमारे साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात जाण्यास सज्ज झाल्या आहेत. पेण येथील या गणेशमूर्तींना बँकॉक, थायलंड आणि अमेरिकेतून मोठी मागणी आहे.  


पेण तालुक्यातील कारखान्यात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात येते. पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे सारख्या अनेक गावांत गणेशाच्या मुर्ती तयार करण्यात येत असून या आकर्षक मूर्त्यांना मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूरसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून या आकर्षक आणि सुबक मूर्त्यांना परदेशात मागणी वाढली आहे.


यावर्षी देखील पेण येथील गणेशमूर्तींना परदेशात मागणी आहे. यामध्ये बँकॉक, थायलंड आणि अमेरिकेत गणेशमूर्ती पाठविण्यात येणार असून थायलंड येथील थाई गणेशाची मूर्ती ही आकर्षक ठरत आहे. 


पेण येथील मुर्तीकाराने थायलंड येथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील वस्त्र, आकार, उपकरणे, अलंकार यांची मांडणी मूर्तीमध्ये केली आहे. यामध्ये सुमारे तीन फूट उंचीच्या या मूर्तीची प्रतिकृती पेणमधील कला केंद्र साकारून या गणेश मुर्ती पुन्हा बँकॉककडे रवाना होत आहे. तर, या मूर्तीतील नक्षीकाम, दोन्ही बाजूला उभ्या रिद्धी- सिद्धी, महीरपीवरील शंकर-पार्वती आणि देवी अशी धाटणीची ही मूर्ती नजरेत सामावून घेण्यासारखी आहे.


पेण येथील कलाकेंद्रामध्ये तीन फुटाच्या मूर्तीसोबत बँकॉक येथे सुमारे अडीच हजार मूर्त्या परदेशात जाण्यास तयार आहेत. अमेरिकेतील टेक्सास येथे सुमारे एक हजार गणेशमूर्ती रवाना होणार आहेत. त्यामध्ये छोट्या इकोफ्रेंडली गणेशमूर्ती आणि पीओपीच्या आठ फूट उंच गणेशमूर्तीचा समावेश आहे.


 

Angarki Chaturthi 2022 : मुंबईत तब्बल दोन वर्षांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीला भाविकांना सिद्धीवियाकाचं थेट दर्शन

Angarki Chaturthi 2022 : मुंबईत तब्बल दोन वर्षांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीला भाविकांना सिद्धीवियाकाचं थेट दर्शन घेता येणार आहे. मध्यरात्री दीड वाजेपासूनच भक्तांसाठी सिद्धिविनायकाचं दर्शन खुले होणार आहे. मंदिरात प्रवेशासाठी असलेली क्यू आर कोड प्रणाली आता शिथील करण्यात आलीय. त्यामुळे अंगारक संकष्टी चतुर्थीला भाविक थेट मंदिरात दर्शनासाठी येऊ शकणार आहेत. तसेच श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना 24 तास ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. 

Angarki Chaturthi 2022 : मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी सर्व निर्बंध उठवले

Angarki Chaturthi : मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी सर्व निर्बंध उठवले. आज अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रात्री दीड वाजल्यापासून भाविकांसाठी बाप्पाचं दर्शन खुलं. मंदिरात प्रवेशासाठी असलेली क्यू आर कोड प्रणाली शिथील. 

Angarki Chaturthi : आज अंगारकी चतुर्थी, सकाळपासूनच राज्यातल्या गणेश मंदिरांमध्ये लगबग

Angarki Chaturthi : आज अंगारकी चतुर्थी आहे. कोरोना निर्बंधमुक्तीनंतर आलेली ही पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यानं आज सकाळपासूनच राज्यातल्या गणेश मंदिरांमध्ये लगबग पाहायला मिळतेय. मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात मध्यरात्री दीड वाजल्यापासूनच बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात आलं आहे. तिकडे रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्यामधील महागणपतीचं दर्शन घेण्युासाठीही पहाटेपासून भक्तांनी रांगा लावल्या आहेत. पुण्याचं दगडूशेठ गणपती मंदीर, नागपूरचा टेकडी गणपती, या मंदिरात आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. निर्बंधमुक्तीमुळे आज भाविकांचा उत्साहही द्विगुणित झाला आहे.

Angarki Chaturthi : कोरोनाच्या निर्बंधांमधून मुक्ती मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा अंगारकी चतुर्थीचा योग

Pune News : कोरोनाच्या निर्बंधांमधून मुक्ती मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा अंगारकी चतुर्थीचा योग आलाय. त्यामुळं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातल्या गणेश मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय. प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरातही पुणेकरांनी पहाटेपासून रांगा लावल्यात. विशेष म्हणजे आज दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची सियाचीनमध्ये देखील प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 

Angarki Chaturthi 2022 : निर्बंधमुक्तीनंतर पहिलाच अंगारकी चतुर्थीचा योग

Angarki Chaturthi 2022 : मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात मध्यरात्री दीड वाजल्यापासूनच बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू आहे. तिकडे रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्यामधील महागणपतीचं दर्शन घेण्युासाठीही पहाटेपासून भक्तांनी रांगा लावल्या आहेत... पुण्याचं दगडूशेठ गणपती मंदीर, नागपूरचा टेकडी गणपती, या मंदिरात आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. निर्बंधमुक्तीमुळे आज भाविकांचा उत्साहही द्विगुणित झालाय.

Angarki Chaturthi 2022 : आज अंगारकी चतुर्थी. कोरोना निर्बंधमुक्तीनंतरची पहिली अंगारकी चतुर्थी

Angarki Chaturthi : आज अंगारकी चतुर्थी. कोरोना निर्बंधमुक्तीनंतरची पहिली अंगारकी चतुर्थी. गणेश मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची लगबग. गणेशभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण. 

Angarki Chaturthi : सांगलीतील गणपती मंदिर अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांनी फुलंलं

Angarki Chaturthi : सांगलीतील गणपती मंदिर अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांनी फुलंलं. मंदिरात आकर्षक सजावट. भाविकांची दर्शनासाठी पहाटे पासून मंदिरात गर्दी 

Angarki Chaturthi : अंगारकी संकष्टीनिमित्त रायगडच्या पाली बल्लाळेश्वराच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

Angarki Chaturthi : अंगारकी संकष्टीनिमित्त रायगडच्या पाली बल्लाळेश्वराच्या दर्शनाला भाविकांची गर्दी, अंगारकी संकष्टीनिमित्त सकाळपासून भाविक आणि गणेशभक्तांची गर्दी...

Angarki Chaturthi : नाशिकच्या पेशवेकालीन नवश्या गणपतीच्या गाभाऱ्यात द्राक्षांची सजावट

Angarki Chaturthi : नाशिकच्या पेशवेकालीन नवश्या गणपतीच्या गाभाऱ्यात द्राक्षांची सजावट. अंगारकी चतुर्थी निमित्ताने नाशिकमधील सर्वच गणेश मंदीर भक्तांनी फुलली. 

Angarki Chaturthi 2022 : भाविकांना सिद्धीविनायकाचं दर्शन घेण्याकरता आता क्यूआर कोडची गरज नाही

Angarki Chaturthi 2022 : भाविकांना सिद्धीविनायकाचं दर्शन घेण्याकरता आता क्यूआर कोडची गरज नाही. आजपासून सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन पूर्वीप्रमाणे घेता येणार. 

पार्श्वभूमी

Angarki Sankashti Chaturthi 2022 : आज गणेशभक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी संकष्टी आहे. मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारकी चतुर्थीचा म्हणतात. ही चतुर्थी अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यात दोनदा येते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला होता, म्हणून ही तिथी गणेशाला समर्पित आहे. अमावस्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणार्‍या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. पण जर चतुर्थी तिथी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. यावेळी अंगारकी चतुर्थी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या तारखेला आहे म्हणजेच हा आज 19 एप्रिल 2022 रोजी आहे. अंगारकी चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' असंही म्हणतात.


'अंगारकी चतुर्थी' हे नाव कसं पडलं?


अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा समज आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते असे मानले जाते. गणेशाच्या या रूपाला 'संकटमोचन गणेश' म्हणतात. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते, त्यावर प्रसन्न होऊन गणरायाने जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल, त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल, असे वरदान दिले होते. त्यामुळे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात.


संकष्टी श्री गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त


चतुर्थी तिथी प्रारंभ : मंगळवार, 19 एप्रिल, संध्याकाळी 04:38 वाजता
चतुर्थी तिथी समप्ती : 20 एप्रिल बुधवारी दुपारी 01:54 वाजता
चंद्रोदयाची वेळ : 19 एप्रिल रात्री 09:50 वाजता
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:54 ते दुपारी 12:46 वाजेपर्यंत


अंगारकी संकष्टी चतुर्थी पूजा विधी


अंगारकी चतुर्थी व्रत करणार्‍यांनी ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करावे. लाल रंगाचे वस्त्र धारण करा यामुळे मंगळ ग्रह अनुकुल राहील. यानंतर 'ॐ गं गणपतये नम:' मंत्राचा जप करत श्री गणेशाची प्रार्थना करा. चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र अंथरुण त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. आता गंगा जल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा. यानंतर फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा. मग लाल रंगांचं फूल, दुर्वा, जान्हवं, पानाचा विडा, लवंग, इलायची आणि गुळ, खोबरं ठेवा. यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करुन 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यानंतर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची आरती करा.


श्री गणेश मंत्र


गजाननं भूत गणादि सेवितं, कपित्थ जम्बू फल चारू भक्षणम्।
उमासुतं शोक विनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम्।।


अंगारकी चतुर्थीची उपासना पद्धत


व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून गणेशाची पूजा करावी.
उपवास न करणाऱ्या व्यक्तींनीही गणेशाची पूजा करावी. 
श्री गणेशाला दुर्वा, धूप-दीप आणि मोदक किंवा लाडू यांसारख्या आवडत्या वस्तू अर्पण करा. यानंतर गणेश चालीसा, गणेश गणेश स्तोत्र किंवा गणेश अथर्वशीर्षाचे पठण करा. गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये.
पूजेच्या दिवसभर 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा जप करत राहा. यासोबतच उपवासाचे नियम पाळून तुम्ही फळेही खाऊ शकता.
चंद्र उगवण्यापूर्वीच गणेशाची आराधना करा.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.