Angarki Sankashti Chaturthi 2021 Live : गणपती बाप्पा मोरया! निर्बंध शिथिलतेनंतरची पहिलीच अंगारकी

Angarki Sankashti Chaturthi 2021 Live : कोरोना काळात कुलुपबंद असलेली मंदिरं आता उघडली आहेत आणि त्यानंतर प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीनिमित्त गणेशभक्त बाप्पाचं दर्शन मंदिरात जाऊन घेऊ शकणार आहेत.

abp majha web team Last Updated: 23 Nov 2021 01:17 PM

पार्श्वभूमी

Angarki Sankashti Chaturthi 2021 Live : गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी आज मंगळवारी आहे. अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि...More

टिटवाळा गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त कल्याण नजीक टिटवाळा येथे महागणपतीचे दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. गर्दी होऊ नये यासाठी गाभाऱ्यातून दर्शन घेण्यास बंदी कारण्यात आली होती. पहाटे चार वाजल्यापासून भाविक दर्शनाला सुरुवात झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, होमगार्ड, सामाजिक संस्था यांची मंदिरं प्रशासनाने मदत घेतली. अंगारकी चतुर्थीनिमित्त आज गणपती बाप्पालाही फुलं आणि दुर्वांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.