Angarki Sankashti Importance : गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी मंगळवारी आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे. मात्र कोरोनामुळे यंदा देखील मंदिरांमध्ये तुलनेनं कमी गर्दी पाहायला मिळू शकते. 


संकष्टीचा अर्थ दुःखाचा पराभव करणारा असा होतो. भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. संकष्टी चतुर्थी हा दिवस सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला समर्पित करण्यात येतो. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते, यामुळे घरात प्रसन्न वातावरण बनतं.


अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूजेचा विधी
या दिवशी पहाटे उठून स्नान करा. यानंतर गणपतीची प्रार्थना करा. चौरंगावर स्वच्छ पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरुन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवा. आता गंगा जल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा. यानंतर फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा. मग लाल रंगांचं फूल, जान्हवं, धूप, पानात सुपारी, लवंग, इलायची आणि एखादी मिठाई ठेवा. यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करुन 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यानंतर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची आरती करा.


संकष्टी चतुर्थीची पूजा- विधी
- सकाळी उठल्यानंतर आधी आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला.
- सकाळी गणपतीची पूजा करा.
- गणपतीला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन अर्पण करा, वंदन करा.
- संध्याकाळी गणपतीचे पूजन करा.
- व्रत कथा सांगा किंवा ऐका.
- चंद्राला अर्ध्य अर्पण करा.
- या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप करावा.
- पूर्ण दिवसभर उपवास ठेवावा. चंद्रोदयानंतर सोडावा.


संबंधित बातम्या


Angarki Sankashti Chaturthi 2021: अंगारकीनिमित्त सिद्धिवियानक मंदिराची जय्यत तयारी; पूजा, आरती ते प्रसादापर्यंत नियमावली जारी


Angarki Sankashti Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा द्या, गणपतीला वंदन करा, असं करा व्रत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha